रुग्णालयात 12 कवट्या अन् 54 हाडं, घरात काळविटाची कातडी; वर्धा अवैध गर्भपात प्रकरणात अखेर डॉ. कदम यांना बेड्या

वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील गर्भपात प्रकरणात (Wardha Abortion Case) अखेर कदम हॉस्पिटलचे डॉ. कदम (Dr. Kadam) यांना अटक करण्यात आलं आहे. या प्रकरणात आतापर्यंत पाच जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. मात्र डॉ. कदम यांना अद्याप अटक करण्यात आलं नव्हतं.

रुग्णालयात 12 कवट्या अन् 54 हाडं, घरात काळविटाची कातडी; वर्धा अवैध गर्भपात प्रकरणात अखेर डॉ. कदम यांना बेड्या
कदम हॉस्पिटल आणि अटक कलेले डॉ. कदम
Follow us
| Updated on: Jan 16, 2022 | 9:38 AM

वर्धा : वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील गर्भपात प्रकरणात (Wardha Abortion Case) कदम हॉस्पिटलचे डॉ. कदम (Dr. Kadam) यांना अखेर अटक करण्यात आलं आहे. या प्रकरणात आतापर्यंत पाच जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. डॉ. कदम यांना अद्याप अटक करण्यात आलं नव्हतं. मात्र आता पोलिसांनी आपल्या तपासाचा वेग वाढवला असून डॉ. कदम यांना अटक केलं आहे. आर्वी गर्भपात प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या आता सहावर पोहोचली आहे. 15 जानेवारी रोजी रात्री उशिरा डॉ. कदम यांना तब्यात घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे या गर्भपात प्रकरणात रोजच नवनवे खुलासे होत आहेत. आर्वी येथील कदम हॉस्पिटलमध्ये (Kadam Hospital) बुधवारी म्हणजेच 12 जानेवारी रोजी बेकायदेशीर गर्भपात होत असल्याचे समोर आले होते.

अगोदर डॉ. रेखा कदम यांच्यासह 5 जणांना अटक 

आर्वी शहरात असलेल्या कदम रुग्णालयात गर्भपात केंद्र आणि सोनोग्राफी सेंटर आहे. गर्भपात केंद्र हे डॉ.रेखा कदम यांच्या सासू डॉ. शैलेजा कदम यांच्या नावावर आहे. तर सोनोग्राफी सेंटर हे डॉ. रेखा कदम आणि डॉ.नीरज कदम या दोघांच्या नावाने आहे. या रुग्णालयात काही दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलीचा गर्भपात करण्यात आला होता. हा प्रकार उघडीस आल्यानंतर मुलीच्या आई व वडिलांसह गर्भपात करणाऱ्या डॉ. रेखा कदम आणि 2 परिचारिका अशा एकूण 5 जणांना पोलिसांनी अटक केलं होतं. आता याच प्रकरणात मध्यरात्री डॉ. नीरज कदम यांना पोलिसांनी अटक केलं आहे. या अटकेमुळे वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ माजली आहे.

हॉस्पिटल परिसरात मिळाली 12 कवट्या अन् 54 हाडं

रेखा कदम यांची पोलीस कोठडीत चौकशी करण्यात येत आहे. त्यांनी आतापर्यंत दिलेल्या माहितीवरुन पोलिसांनी 12 जानेवारी रोजी रुग्णालय परिसरातील बायोगॅस चेंबरमध्ये 13 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या गर्भपाताचे भ्रुण शोधण्यासाठी तपासणी केली. याच दरम्यान पोलिसांना त्याच चेंबरमध्ये 12 कवट्या अन् 54 हाडं आढळून आली. त्यानंतर पोलिसांनी डॉ. रेखा कदम यांना सहकार्य करणाऱ्या दोन परिचारिकांनाही अटक केली आहे. शनिवारी मध्यरात्री 1 वाजून 45 मिनिटांनी या प्रकरणात डॉक्टर नीरज कदम यांनासुद्धा पोलिसांनी अटक केलं आहे. कदम रुग्णालयातील सोनोग्राफी केंद्रा हे डॉ. रेखा कदम आणि डॉ. नीरज कदम यांच्या नावाने आहे.

कदम यांच्या घरात आढळली काळविटीची कातडी

याच कदम रुग्णालयाच्या गर्भपात केंद्राचा परवाना हा डॉ. शैलेजा कदम यांच्या नावे असल्याने त्यांनाही चौकशीसाठी सूचनापत्र पोलिसांनी बुधवारी दिले होते. मात्र, या दरम्यान शैलेजा कदम यांची प्रकृती खालावली. शुक्रवारी त्यांना नागपूर येथील खासगी रुग्णायलात उपचारासाठी दाखल केल्याची माहिती आहे. शनिवारी सकाळपासूनच कदम रुग्णालय परिसरात डॉ. नीरज कदम यांना सोबत घेत आर्वी पोलिसांसह आरोग्य विभागाच्या पथकाने तपासणी केली. याच दरम्यान पोलिसांना कदम यांच्या घरात काळविटीची कातडी आढळली. तर आरोग्य विभागाच्या पथकला काही औषधी आणि इंजेक्शनसुद्धा मिळाले असून ते आरोग्य विभागाने जप्त केले आहे. दिवसभर चाललेल्या तपासणीनंतर आर्वी पोलिसांनी डॉ. नीरज कदम यांना मध्यरात्री बेड्या ठोकल्या. त्यामुळे आता याप्रकरणात आरोपी संख्या सहावर पोहचली आहे.

सोनोग्राफी केंद्राच्या परवान्याची मुदत संपली

डॉ. कदम रुग्णालयात असलेल्या गर्भपात केंद्राचा परवाना हा डॉ. शैलेजा कदम यांच्या नावावर होता. डॉक्टर शैलजा कदम या रेखा कदम यांच्या सासू आहेत. तर सोनेग्राफी सेंटरचा परवाना डॉ. रेखा आणि डॉ. नीरज कदम यांच्या नावे होता. विशेष म्हणजे या सोनोग्राफी केंद्राच्या परवान्याची मुदत 19 डिसेंबर 2021 मध्येच संपली होती. परवाना नुतनीकरणासाठी त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे प्रस्ताव पाठविला असून परवाना नुतनीकरण प्रक्रियेत आहे. मात्र, गर्भपाताचा कुठलाही परवाना नसताना डॉ. रेखा कदम यांनी गर्भपात केला कसा, हा प्रश्न निर्माण होतो आहे.

इतर बातम्या :

SPPU Exam | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईनच, तारीखही ठरली

Wardha : वर्धा गर्भपात प्रकरण : डॉ. कदम यांच्या घरी सापडली गर्भपातासाठी लागणारी शासकीय औषधं, सूत्रांची माहिती

Uttarakhand Crime : डेहराडूनमध्ये नात्याला काळिमा; सावत्र आईवर बलात्कार करुन जबरी मारहाण, गंभीर जखमी पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.