सोन्याच्या आमिषाने १० लाखांची फसवणूक, त्या आरोपीला पकडलं तरी कसं ?

समुद्रपूर पोलिसांनी तातडीने कारवाई करत गुन्हा घडल्यानंतर २४ तासांच्या आत त्या भामट्याला बेड्या ठोकत अटक केली. त्याच्याकडून १० लाख रुपयांची रोकडही जप्त करण्यात आली.

सोन्याच्या आमिषाने १० लाखांची फसवणूक, त्या आरोपीला पकडलं तरी कसं ?
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Oct 07, 2023 | 2:03 PM

वर्धा | 7 ऑक्टोबर 2023 : बनावट दागिने (fraud case) दाखवून फसवणूक करणाऱ्यांचे प्रमाण आजकाल वाढले आहे. अशा रितीने कित्येक लोकांना गंडा घालून पैसे लुटण्याच्या घटनाही समोर येत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना वर्ध्यात घडली आहे. तेथे एका भामट्याने बनावट सोनं  (fake gold) दाखवून एका इसमाची फसवणूक केली. त्याच्याकडून १० लाख रुपये घेऊन तो फरार (crime case) झाला.

मात्र हातात आलेलं सोनं खोटं असल्याचं समजल्यानंतर त्या इसमाच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याने तातडीने समुद्रपूर पोलिस स्टेशनमध्ये धाव घेऊन तेथील अधिकाऱ्यांना आपली फसवणूक झाल्याचे सांगत घडलेला प्रकार कथन केला. पोलिसांनी तत्परतेने कारवाई सुरू करत अवघ्या २४ तासांच्या आत अटक केली. तसेच त्याच्याकडून दहा लाख रुपयेही जप्त केले. दुसऱ्या आरोपीचा शोध अद्याप सुरू आहे.

असा घडला गुन्हा

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी नईमुद्दीन काजी यांच्याकडे दोन व्यक्ती आल्या होत्या. त्यांनी काजी यांना सोन्याचा एक तुकडा दाखवत ते विकायची इच्छा व्यक्त केली. सुमारे एक किलोचा हा तुकडा खोदकामात सापडल्याचे त्यांनी काजी यांना सांगितले. नीट तपासणी करून काजी यांनी ते सोन विकत घेण्यास समहती दर्शवली.

३ ऑक्टोबर रोजी काजी व त्यांचा मुलगा सोन खरेदीसाठी आले होते. तेथे आरोपी व त्याचे साथीदार त्यांना भेटले. त्यांनी सोन्याचा तुकडा काजी यांच्या हवाली केला. त्याबदल्यात त्यांच्याकडून १० लाख रुपये घेतले. त्यानंतर काजी व त्यांचा मुलगा कारने घरी परत निघाले. मात्र तपासणी करत असताना ते सोनं खरं नसून बनावट असल्याचं त्यांच्या लक्षात आल्याने ते हादरलेच.

त्या भामट्यांनी आपली फसवणूक करून १० लाख रुपये लुटल्याचेही त्यांना समजले. त्यांनी तातडीने समुद्रपूर पोलिस स्टेशनमध्ये धाव गाठलं. तेथील संबंधित पोलीस अधिकाऱ्यांसमोर सर्व घटनाक्रम सांगितला आणि फसवणुकीची तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी तपास करत २४ तासांच्या आतमध्ये आरोपीच्या मुसक्या आवळल्या. तसेच त्याच्याकडून १० लाख रुपयेही जप्त करत ते फिर्यादीला परत केले. मात्र याप्रकरणातील दुसरा आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.