Wardha Crime : पोलिसांच्या देखत पत्नीच्या तोंडात टाकले विष, आरोपी पतीस अटक, आर्वी येथील खळबळ घटना

याप्रकरणी आर्वी पोलिसांनी पत्नीच्या जबाबावरुन पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन पीडित पत्नी मुलाला घेण्यासाठी घरी गेली होती. ही खळबळजनक घटना आर्वी शहराच्या आसोले लेआऊट परिसरात घडली.

Wardha Crime : पोलिसांच्या देखत पत्नीच्या तोंडात टाकले विष, आरोपी पतीस अटक, आर्वी येथील खळबळ घटना
पोलिसांच्या देखत पत्नीच्या तोंडात टाकले विष, आरोपी पतीस अटकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 25, 2022 | 8:06 PM

वर्धा : वर्धा जिल्ह्यातील आर्वी शहरात एका विकृत पतीने पोलिसांच्या समोरच पत्नीला शिवीगाळ (Abused) आणि मारहाण (Beaten) करत तिच्या तोंडात विषारी औषध (Poison) टाकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. काजल असे पीडित पत्नीचे नाव असून निलेश असे आरोपी पतीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी निलेशला अटक केली आहे. याप्रकरणी आर्वी पोलिसांनी पत्नीच्या जबाबावरुन पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन पीडित पत्नी मुलाला घेण्यासाठी घरी गेली होती. ही खळबळजनक घटना आर्वी शहराच्या आसोले लेआऊट परिसरात घडली. महिलेवर आर्वी येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

काय आहे प्रकरण ?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पतीने मारहाण केल्याने काजल ही पती निलेश विरोधात तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेली होती. आरोपी पतीने मुलाला सोबत नेऊ न दिल्याने पोलिसांना ही बाब सांगून मुलाला सोबत देण्याची विनंती तिने केली. दोन पोलीस कर्मचारी महिलेसोबत तिच्या घरी मुलाला आणण्यासाठी गेले. तिने मुलाला सोबत घेत काही कपडे घेत असतानाच संतापलेल्या पतीने पत्नीला पकडून मारहाण करायला सुरुवात केली. तसेच जबरदस्तीने तिच्या तोंडात विषारी औषध पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. काजलने जोरजोरात आरडाओरड केली असता घराबाहेर उभ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेत आरोपी पती आणि मुलाला पोलीस ठाण्यात आणले. तसेच जखमी काजलला तात्काळ आर्वी येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. (Wardha Police arrests husband who tried to kill his wife by poisoning her)

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.