घरी सोडायला सांगितलं होतं, तिघेजण शेतात घेऊन गेले, कारण समजल्यानंतर पोलिस हादरले
वाशिम जिल्ह्यात एक भयंकर प्रकरण उजेडात आलं आहे. मानोरा तालुक्यातील एका गावात तरुणीवरती तीन तरुणांनी अत्याचार केला आहे.
वाशिम : वाशिम (Washim) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणीला घरी सोडण्यासाठी एका मित्राने सांगितले. त्यानंतर तो मित्र त्या तरुणीला शेतात (crime news) घेऊन गेला. तीन दिवस तरुणी बेपत्ता असल्यामुळे तिच्या आईवडिलांनी या प्रकरणी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केली. त्यावेळी तिघांपैकी एकाने त्या तरुणीला तिथल्या परिसरात आणून सोडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्या तरुणीचं वय 22 असून हा प्रकार 16 जून ते 18 जून दरम्यान घडला आहे. या प्रकरणातील एका आरोपीला पोलिसांनी (washim police) अटक केली असून त्याची कसून चौकशी करण्यात येणार आहे. या प्रकरणातील मुख्यसुत्रधार कोण आहे याचा सुध्दा पोलिस तपास करीत आहेत.
नेमकं काय झालं
या प्रकरणात पीडित तरुणीच्या फिर्यादीनंतर तिघांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल केला आहे. त्यापैकी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. मानोरा तालुक्यातील एका गावातील 22 वर्षीय तरुणीला सिमेंट दुकानात काम करणाऱ्या एका व्यक्तीने 16 जूनला फोन करून भेटायला बोलविले होते. त्यावेळी तिथं मित्र आणि नितीन दयाराम पवार आले. मात्र मिथुन राठोडला दुकानावरून फोन आल्याने तो निघून गेला. त्यावेळी त्याला तरुणीला गावी सोडून दे असं सांगितलं होतं.
तीन दिवस अत्याचार झाला
त्यावेळी त्या व्यक्तीने घरी न सोडता, त्या तरुणीला शेतात घेऊन गेला आणि तिच्यावर अत्याचार केला. ही घटना 16 जून ते 18 जूनदरम्यान घडली आहे. मुलगी दोन दिवस घरी न आल्यामुळे तिचे आईवडिल मानोरा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी आले होते. या गोष्टीची माहिती तीन आरोपींना लागल्यानंतर त्यांनी त्या तरुणीला पोलिस स्टेशनच्या जवळ असलेल्या मंदीराच्या शेजारी सोडले.
पोलिस पथक चौकशीत गुंतलं
त्यानंतर पीडित तरुणीने मानोरा पोलीस स्टेशन गाठून अत्याचार झाल्याची फिर्याद दाखल केली आहे. तीन आरोपी विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपी नितीन पवार याला मानोरा पोलिसांनी अटक केली आहे. घटनेचा तपास कारंजा उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे, पोलीस उपनिरीक्षक सविता वड्डे, पोलीस जमादार दीपक डोबाळे, गणेश जाधव, बालाजी महले,रवी राजगुरे हे पोलिसांचं पथक करीत आहे.