Washim Accident News : मायलेकाच्या शरीरावरुन भरधाव ट्रकची चाकं धडधडत गेली आणि….
नागपूर औरंगाबाद महमार्गावर गेल्या काही दिवसांत झालेल्या अपघातांची संख्या लक्षणीय आहे. 3 दिवसांत तब्बल चार जणांचा या महामार्गवर झालेल्या अपघातात मृत्यू झालाय. आज घडलेला हा अपघात अत्यंत भीषण होता.
वाशिम : दुचाकीवरुन जाणाऱ्या मायलेकाच्या शरीरावरुन भरधाव ट्रकची चाकं धडधडत गेली. या भीषण अपघातात (Washim Accident News) मायलेकाचा जागच्या जागीच जीव गेला. ही काळीज पिळवटून टाकणारी घटना वाशिम (Washim) जिल्ह्यात घडली. मायलेक दुचाकीवरुन एकत्र जात होते. बाजारात जाण्यासाठी ते दोघं निघाले होते. त्यावेळी एक भरधाव ट्रक काळ बनून आला. दुचाकीनं जबर धडक दिली. यात मायलेकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातानंतर मायलेकाचे मृतदेह (Mother Son killed in road Mishap) रस्त्यावरच रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. या अपघातानं प्रत्यक्षदर्शीही हादरुन गेले होते.
ट्रकची समोरुन धडक
वाशिम जिल्ह्यातील औरंगाबाद-नागपूर द्रूतगती मार्गावरील वाई फाट्याजवळ हा अपघात घडला. आई आणि मुलगा दुचाकीवरुन बाजारात जायला निघाले होते. त्यावेळी समोरुन येत असलेल्या एका भरधाव ट्रकने बाईकला जबर धडक दिली.
ट्रकची चाकं शरीरावरुन गेल्यामुळे मायलेकाचा या अपघातामध्ये जागीच मृत्यू झाला. दोघांचेही मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावरच पडून होते. या अपघातानंतर हायवेवर लोकांनी एकच गर्दी केली होती. अपघातग्रस्त दुचाकीचा क्रमांक एमएच 37 सी 2136 असा होता.
या अपघातामुळे औरंगाबाद-नागपूर हायवेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळालं. अखेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघाताचा पंचनामा केला. त्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.
पाहा लाईव्ह घडामोडी : Video
मायलेकावर काळाचा घाला
अपघातात मृत्यू झालेल्या आई आणि मुलाची ओळखही पटली आहे. चंद्रकला शांताराम करवते असं मृत महिलेचं नाव आहे. त्याचं वय 60 वर्ष होतं. तर वसंता शांताराम करवते, असं मुलाचं नाव नाव आहे. हे दोघेही जण मेडशी येथील राहणारे होते, अशी माहिती समोर आलीय.
नागपूर औरंगाबाद महमार्गावर गेल्या काही दिवसांत झालेल्या अपघातांची संख्या लक्षणीय आहे. 3 दिवसांत तब्बल चार जणांचा या महामार्गवर झालेल्या अपघातात मृत्यू झालाय. वाढत्या अपघाती मृत्यूंमुळे चिंताही व्यक्त केली जातेय.
12 तासांच्या आत दुसरा अपघात
राज्यात गेल्या 24 तासांत झालेला हा दुसरा अपघात आहे. अवघ्या 12 तासांच्या आतच तिघांचा रस्ते अपघातात मृत्यू झालाय. मध्यरात्री पुण्यात शिवशाही बस आणि एका कंटेनरचा भीषण अपघात झालेला होता. या अपघातामध्ये शिवशाही बसमधील एकाचा मृत्यू झालेला होता. त्यानंतर आता वाशिमध्ये झालेल्या भीषण अपघातात आई आणि मुलाचा जीव गेलाय. त्यामुळे हळहळ व्यक्त केली जातेय.