Video : मृत्यूला स्पर्श करुनच तो रिक्षावाला जिवंत परतला! थरारक सीसीटीव्ही, भरधाव ट्रेन धडधडत आली आणि…
शुक्रावारी दुपारी 12.20 मिनिटांनी गाडी नंब 02563 अप बरौनी दिल्ली एक्स्प्रेस रवाना होणार होती. त्यामुळे रेल्वे फाटक बंद करण्यात आलं होतं. याच दरम्यान, रिक्षा चालक सद्दाम पुत्र बिल्ल, हा 23 वर्षांचा तरुण रिक्षा घेऊन रेल्वे ट्रॅकवरन जात होता. रेल्वे फाटक बंद असतानाही तो पुढे गेला.
अंगावर काटा आणणारं रेल्वे फाटकातील एक थरारक सीसीटीव्ही (CCTV Video) फुटेज समोर आलं आहे. एएनआयने हा व्हिडीओ जारी केला आहे. या व्हिडीओमध्ये एक रिक्षावाला अगदी थोडक्यात बचावला. हातरिक्षा (Rikshaw Accident) रेल्वे फाटकातून (Railway Crossing) नेतेवेळी एक भरधाव एक्स्प्रेस आली. रेल्वे ट्रेकवर रिक्षा खेचत नेत असताना एक क्षणात रिक्षाला ट्रेनने जबरदस्त धडक दिली. काही कळायच्या आत रिक्षावाला मागे फिरला म्हणून अगदी थोडक्यात त्याचा जीव वाचलाय. ही घटना घडल्यानंतर रेल्वे फाटक पार पर करत असलेल्या सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकला होता. 9 सप्टेंबर रोजी ही घडना घडली. उत्तर प्रदेशच्या अलिगड येथे रेल्वे फाटकादरम्यान घडलेला हा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय.
पाहा व्हिडीओ :
#WATCH | Narrow escape for a rickshaw puller while crossing a railway track in Uttar Pradesh’s Aligarh. (09.09) pic.twitter.com/Tb49XcaXcc
हे सुद्धा वाचा— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) September 11, 2022
अलिगड इथं शुक्रवारी रेल्वे क्रॉसिंग दरम्यान एक रिक्षा वालावाला थोडक्यात वाचला. रेल्वेचं फाटक बंद होतं. तरिही काही जण रेल्वे ट्रॅक क्रॉस करण्याच्या प्रयत्नात होते. बरेच जण रेल्वे ट्रॅक पार करुन सुरक्षित अंतरावर आले देखील. पण एक हात रिक्षा हाकणारा व्यक्ती पुढे पुढे जातच राहिला. अनावथानाने तो रेल्वे ट्रॅकच्या मध्यापर्यंत पोहोचला. इतक्यात एक भरधाव एक्स्प्रेस धडधडत आली आणि तिने हातरिक्षाला जबर धडक दिली.
या धडकेवेळी रिक्षावाल्यानेमी मागे उडी टाकली. यात रिक्षाचा तर चक्काचूर झाला. पण रिक्षावाला अगदी थोडक्यात वाचला. मृत्यू स्पर्श करुनच परत जिवंत परल्याचा अनुभव जणू या रिक्षावाल्याला आला असावा, असा हा प्रसंग घडला.
पाहा लाईव्ह घडामोडी : Video
या थरारक घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर, प्रवाशांना रेल्वे फाटक पार न करण्याचं आवाहन केलं जातंय. रेल्वे फाटक बंद असताना ते पार करणं धोकादायक ठरु शकतं, याची जाणीव हे सीसीटीव्ही फुटेज पाहून येईल. या घटनेबाबत रेल्वे पोलिसांनी अधिक माहिती दिली आहे.
शुक्रावारी दुपारी 12.20 मिनिटांनी गाडी नंब 02563 अप बरौनी दिल्ली एक्स्प्रेस रवाना होणार होती. त्यामुळे रेल्वे फाटक बंद करण्यात आलं होतं. याच दरम्यान, रिक्षा चालक सद्दाम पुत्र बिल्ल, हा 23 वर्षांचा तरुण रिक्षा घेऊन रेल्वे ट्रॅकवरन जात होता. रेल्वे फाटक बंद असतानाही तो पुढे गेला. नेमक्या त्याच क्षणी भरधाव एक्स्प्रेस आली आणि तिने धडक देत रिक्षाचा चक्काचूर केला. बिलालने लगेच मागे उडी टाकली, म्हणून त्याचा जीव अगदी थोडक्यात वाचलाय. रेल्वे फाटक बंद असूनही जीवघेणा प्रयत्न करणाऱ्या रिक्षाचालकाला रेल्वे पोलिसांनी आता अटक केली आहे.