Video : भरधाव रेल्वेचं इंजिन धडधडत आलं आणि ट्रकला धडकलं! व्हिडीओही समोर, थोडक्यात मोठा अनर्थ टळला

A train collided with a truck Video : रेल्वे क्रॉसिंगदरम्यान हा अपघात घडल्याचं दिसून आलंय. ट्रकला ठोकर दिल्यानंतर प्रवासी रेल्वे पुढे जाऊन थांबली होती.

Video : भरधाव रेल्वेचं इंजिन धडधडत आलं आणि ट्रकला धडकलं! व्हिडीओही समोर, थोडक्यात मोठा अनर्थ टळला
थोडक्यात मोठा अनर्थ टळलाImage Credit source: Twitter Video Grab
Follow us
| Updated on: Jul 07, 2022 | 1:11 PM

मुंबई : कर्नाटकात (Karnataka Train Accident News) थोडक्यात एक मोठा अपघात टळलाय. एका प्रवाशी रेल्वे एक्स्प्रेने जोरात एका ट्रकला धडक दिली. यात ट्रकचं मोठं नुकसान झालंय. रेल्वे ट्रॅकवरही हा ट्रक अडकून पडला होता. इतक्या भरधाव ट्रेन धडधडत येत होती. यावेळी ट्रकला धडकण्याआधी (A train collided with a truck Video) ट्रेन नियंत्रणात आणण्याचा चालकाने खूप प्रयत्न केला. पण तो फक्त वेग कमी करु शकला. ट्रेन चालकाला ही ठोकर रोखण्यात मात्र अपयश आलं. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यातही कैद (Train Accident video) झाली आहे. काळजाचा ठोका चुकणावारा हा अपघात होता. सुदैवानं या अपघातामA train collided with a truckध्ये कुणालाही दुखापत झाली आहे. तसंच कोणहीती जीवितहानीही झाली नाही. मात्र ट्रकचं यात नुकसान झालंय. ट्रेनच्या चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे या प्रवासी ट्रेनमधील सर्व प्रवासीही बालंबाल बचावले आहेत. थोडक्यात मोठा अनर्थ यावेळी टळलाय.

पाहा व्हिडीओ :

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Asian News International (@ani_trending)

एएनआय वृत्त संस्थेनं याबाबतचा व्हिडीओ जारी केला आहे. रेल्वे क्रॉसिंगदरम्यान हा अपघात घडल्याचं दिसून आलंय. ट्रकला ठोकर दिल्यानंतर प्रवासी रेल्वे पुढे जाऊन थांबली होती. ट्रकला धडक दिल्यानंतर ट्रकमधील सामान खाली कोसळलं होतं. तसंच ट्रकच्या मागच्या बाजूलाही मोठा मार बसून नुकसान झालं. यावेळी प्रवाशांनाही ट्रक आणि ट्रेनच्या धडकेने हादरा बसला आणि सगळेच धास्तावले होते. एखाद्या सिनेमात दाखवल्या जाणाऱ्या सीनप्रमाणे हा अपघात घडला.

नेमका कुठे घडला अपघात?

आजच (7 जुलै) ही घटना घडली. सकाळच्या सुमारास ही घटना घडली. कर्नाटकच्या भालकी येथील रेल्वे क्रॉसिंगदरम्यान, ही घटना घडली. भालकीचं रेल्वे क्रॉसिंग कर्नाटकच्या बिडार इथं आहे. ही संपूर्ण घटना एकानं दुरुन कॅमेऱ्यात कैद केली आहे. महत्त्वाचं म्हणजे एक माणूस यावेळी रेल्वे फाटक पकडून उभा असल्याचंही दिसून आलंय.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.