Video: ‘माझ्याशी वाकडं नदीवर लाकडं’ भाजपच्या कॅबिनेट मंत्र्यासमोरच भिडले आमदार आणि कार्यकर्ते, दे दणादण राडा!

Fight in front of Minister Jitin Prasad Video : भांडण इतकं विकोपाला गेलं की अखेर आमदाराच्या समर्थकांनी भाजपचे मागासवर्गीय मोर्चाचे राज्य कार्यकारीणी सदस्य असलेल्या मनमोहन सैनी यांना बेदम मारहाण केली. 

Video: 'माझ्याशी वाकडं नदीवर लाकडं' भाजपच्या कॅबिनेट मंत्र्यासमोरच भिडले आमदार आणि कार्यकर्ते, दे दणादण राडा!
तुफान राडाImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 10, 2022 | 10:39 AM

मुंबई : मंत्री, आमदारांसमोरच कार्यकर्ते भिडण्याच्या घटना नव्या नाहीत. आता पुन्हा अशीच एक घटना उत्तर प्रदेशातून (Uttar Pradesh Fight) समोर आली आहे. उत्तर प्रदेशात कॅबिनेट मंत्र्यासमोरच (Cabinet Minister in UP) भाजपच्या कार्यकर्त्यांना तुफान राडा केला. लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. गुरुवारी रात्री ही घटना घडली. मंत्र्यांसमोरच आमदार आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांमध्ये भिडले. मुरादाबादमध्ये ही घटना घडली असून या घटनेवरुन आता चर्चांना उधाण आलंय. उत्तर प्रदेशचे सार्वजनिक बांधकाम मंत्री जितीन प्रसाद (Fight in front of Jitin Prasad Video) यांच्या उपस्थितीत एक बैठक सुरु होती. या बैठकी दरम्यान जोरदार राडा झाला. भाजप मागासवर्गीय मोर्चाचे कार्यकारीणी सदस्य मनमोहन सैनी यांचा जबर मारहाण यावेळी करण्यात आली. बैठकीत आधी वाद झाला. मग शाब्दिक बाचाबाची वाढली. अखेर परिस्थिती अधिकच चिघळली आणि तुफान राडा झाला.

पाहा व्हिडीओ :

कशावरुन राडा?

मुराबादच्या सर्किट हाऊसमध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलेल. यावेळी सर्किट हाऊसमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री जितीन प्रसाद यांच्या समोरच मनमोहन सैनी आणि स्थानिक आमदार रितेश गुप्ता यांच्या भांडण झालं. भांडण इतकं विकोपाला गेलं की अखेर आमदाराच्या समर्थकांनी भाजपचे मागासवर्गीय मोर्चाचे राज्य कार्यकारीणी सदस्य असलेल्या मनमोहन सैनी यांना बेदम मारहाण केली.

विकासाच्या मुद्द्यावर वाद…

गुरुवारी रात्री बोलावण्यात आलेल्या या बैठकीत विकासाच्या मुद्द्यावरुन वादाला सुरुवात झाली. मनमोहन सैनी यांनी विकासाचा मुद्दा उपस्थित केला. आमदार असूनही स्थानिक भागाचा विकास होत नाही, असं म्हणत त्यांनी रितेश गुप्ता यांच्यावर गंभीर आरोप केले. या आरोपांनंतर रितेश गुप्ता यांना राग आला. संतापलेल्या रितेश गुप्ता यांनी, ‘तू माझं नाव कसं घेतलंस?’ असा जाब विचारला. त्यावरुन दोघांमध्येही जोरदार वाद सुरु झाला. हा वाद सुरु असताना मंत्रीमहोदय जितीन प्रसाद शांतपणे त्यांच्या खुर्चीत बसले होते, असंही सांगितलं जातंय.

दरम्यान, याआधीही अनेकदा भाजपमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आलेली आहे. महाराष्ट्रातही अशा घटना नोंदवल्या गेल्यात. दरम्यान, आता उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमधील घटना चर्चेत आलीय. यात आमदाराला किरकोळ जखमही झाल्याचं सांगितलं जातंय.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.