Video | बसची कारला धडक, कालचालक महिलेनं बसचालकाच्या थोबाडीत लगावली कडक! चूक कुणाची?
Andra Pradesh Viral Video : आंध्र प्रदेशातून समोर आलेल्या या व्हिडीओमध्ये दिसणार महिला खरंतर एका कारची चालक आहे. तिच्या कारला बसनं धडक दिली म्हणून ती संतापली. भडकलेल्या महिलेनं कारमधून उतरून बसमध्ये प्रवेश केला.
आंध्र प्रदेश : महिला गाडी चालवत (Women driving cars) असतील, तर जरा लांबूनच गाडी चालवत जा, असं गंमतीनं म्हटलं जातं. महिलांना गाडी चालवता येते, की नाही, यावरुन बऱ्याच चर्चा रंगलेल्या असतील. तुम्हीही ऐकलेल्या असतील. पण आता जी बातमी समोर आली आहे, ती चर्चेला काहीशी फोडणी देणारीच आहे. एका महिलेनं बस चालकाला मारहाण केली आहे. बसमध्ये चढून मारहाण करणाऱ्या या महिलेचा व्हिडीओदेखील समोर आला आहे. बस चालकाचं शर्ट ओढत, त्याला बस ड्रायव्हिंग सीटवरुन (Bus Driving Seat) उठवण्याचा प्रयत्न ही महिला करताना दिसते. यानंतर रागाच्या भरात ती या चालकाच्या थोबाडीतही लगावताना दिसली आहे. हा संपूर्ण प्रकार एकानं आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात (Mobile Camera) कैद केलाय. या व्हिडीओनंतर आता चर्चा सुरु झाले आहे, ती म्हणजे नेमकी या सगळ्या मारहाणी मागचं कारणं काय होतं? नेमकी चूक कुणाची होती? आणि हा सगळा प्रकार घडला कुठंय?
हा व्हिडीओ आहे आंध्रप्रदेशातील. आंध्र प्रदेशच्या विजयवाडा पोलीस स्टेशनमध्ये हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी तक्रारही दाखल करण्यात आली असून पोलिस आता अधिक कारवाई करत आहेत. नेमकं व्हिडीओत जे दिसलं, त्यातून बस चालकानंच काहीतरी चुकीचं केल्याचा भास किंवा संशय येऊ शकेल. कारण ज्या तोऱ्यात ही महिला बस चालकाला मारहाण करताना दिसतेय, ते अनेक सवाल उपस्थित करणारं आहे.
नेमकं काय झालं?
आंध्र प्रदेशातून समोर आलेल्या या व्हिडीओमध्ये दिसणार महिला खरंतर एका कारची चालक आहे. तिच्या कारला बसनं धडक दिली म्हणून ती संतापली. भडकलेल्या महिलेनं कारमधून उतरून बसमध्ये प्रवेश केला. चालकाची कॉलर धरली. त्याला मारहाण केली. शिव्या दिल्या. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला.
दरम्यान, चकीत करणारी गोष्ट म्हणजे बस चालकानं ज्या कारला धडक दिली, ती कार चुकीच्या दिशेनं चालवली जात होती. महिला चुकीच्या दिशेनं कार चालवत असल्याकारणामुळे बसची धडक कारला बसली. पण महिलेनं आपलंच खरं करत या बस चालकावर अरेरावी करत त्याला मारहाण केली आहे. याप्रकरणी महिलेविरोधातच पोलिसांत तक्रार दाखल झाली आहे.
पाहा नेमकं काय घडलं?
संबंधित बातम्या :
परभणीत सततच्या छेडछाडीला कंटाळलेल्या मुलीकडून रोड रोमिओला चोप, सोशल मीडियावर व्हीडिओ व्हायरल
क्लासला जाते म्हणून निघाली अन् थेट बंगालला गेली, मोबाईल गेमच्या नादात अल्पवयीन मुलीनं सोडलं घर
इंस्टाग्रामवर ‘थेरगाव क्वीन’च्या 40 पेक्षा जास्त अकाऊंटबाबत पिंपरी पोलिस उचलणार ‘हे’ पाऊल