चोरूनलपून नको ते व्हिडीओ इंटरनेटवर पाहताय?, असं करू नका; नाहीतर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल…

बरेच लोक खासगी प्लॅटफॉर्मवर ॲडल्ट कंटेंट पहात असतात. आणि आपण काय बघतोय, हे कोणालाच माहीत नाही असं त्यांना वाटत असतं. पण हे काही खरं नाही. उलट अशावेळेला हजारोचं तुमच्यावर लक्ष असतं. तुमची प्रत्येक कृती ही कोणाच्या तरी नजरेखालून जात असते.

चोरूनलपून नको ते व्हिडीओ इंटरनेटवर पाहताय?, असं करू नका; नाहीतर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल...
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Nov 17, 2023 | 11:42 AM

मुंबई | 17 नोव्हेंबर 2023 : इंटरनेटवर प्रत्येक प्रकारचा कंटेट उपलब्ध असतो. आपल्या देशात ॲडल्ट कंटेंटवर बंदी असली तरी असे असूनही लोक गुप्तपणे इंटरनेटवर असे व्हिडीओज पहात असतात. अशा प्रकारचा कंटेंट इंटरनेटवर सहज उपलब्ध आहे. बरेच लोक खासगी प्लॅटफॉर्मवर या प्रकारचा कंटेंट पहात असतात. आणि आपण काय बघतोय, हे कोणालाच माहीत नाही असं त्यांना वाटत असतं. पण हे काही खरं नाही. उलट तुम्ही जेव्हा ॲडल्ट कंटेंट बघत अता, तेव्हाच हजारो एआय बॉट्स तुमच्यावर लक्ष ठेवून असतात.

मोबाईल ॲप्सही ठेवतात नजर

जेव्हा तुम्ही तुमच्या मोबाइलवर ॲडल्ट कंटेंट पाहता, तेव्हा त्याबद्दलची पहिली माहिती तुमच्या मोबाइल सर्व्हिस ऑपरेटरकडे जाते. एवढचं नाही तर तुमच्या फोनमध्ये असलेले ॲप्सही त्याकडे लक्ष ठेवून असतात. तुमच्या फोनवरील ॲप्सही अशा प्रकारचा कंटेंट पाहताना एखाद्या गुप्तचर संस्थेप्रमाणे तुमच्यावर लक्ष ठेवतात. म्हणजे त्या वेळी तुमचा संपूर्ण ब्राउझिंग इतिहास ट्रॅक केला जात असतो.

सोशल मीडिया प्रोफाईल वरही असेत लक्ष

रिपोर्ट्सनुसार, तुमच्या ब्राउझिंग पॅटर्नवर तुमचे ट्रॅकिंग आधारित असते. तसेच तुमच्या सोशल मीडिया प्रोफाइलचीही छाननी केली जाते. यानंतर तुम्हाला कोणती जाहिरात दाखवायची हे ठरवले जाते. जर एखाद्याला ॲडल्ट कंटेंट पहायेचे व्यसन असेल तर त्याला फक्त त्याच्याशी संबंधित जाहिराती दाखवल्या जातात. असा कंटेंट पाहण्यासाठी जे लोक पेड सर्व्हिस घेतात ते (जाहिरातदारांचे) पहिले लक्ष्य किंवा टार्गेट असतात. तेच सर्वप्रथम निशाण्यावर येतात. हे लोकजेव्हा पेमेंट करत असतात, तेव्हा त्यांच्या बँक अकाऊंट्सचे डिटेल्सही घेतले जातात. त्यामुळे त्याच्या क्रेडिट अथवा डेबिट कार्डचा गैरवापरही होऊ शकतो.

फोनमध्ये व्हायरस टाकता येतो

तुम्ही तुमच्या मोबाईलवर ॲडल्ट कंटेंट पाहत असाल किंवा डाउनलोड करत असाल तर अशा कंटेंटद्वारे तुमच्या मोबाईलमध्ये मालवेअर किंवा व्हायरसही येऊ शकतात. या मालवेअरच्या माध्यमातून नंतर तुमच्यावर हेरगिरीदेखील करता येऊ शकते. तसेच तुमचे खाजगी फोटो सार्वजनिक करण्याची धमकी देऊन तुम्हाला ब्लॅकमेलही केले जाऊ शकते. कॅस्परस्की लॅबच्या 2018 च्या अहवालानुसार, प्रौढ सामग्री पाहिल्यामुळे सुमारे 12 लाख Android वापरकर्ते मालवेअरने प्रभावित झाले होते, एवढ्या लोकांना त्याचा फटका बसला होता.

Non Stop LIVE Update
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?.
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी.
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?.
मुंबईत सर्वाधिक मतदान 'या' मतदारसंघात तर सर्वात कमी मतदान कुठे?
मुंबईत सर्वाधिक मतदान 'या' मतदारसंघात तर सर्वात कमी मतदान कुठे?.
सत्ता स्थापनेबाबत महायुतीच्या मंत्र्याचं मोठं वक्तव्य, 'गरज पडल्यास..'
सत्ता स्थापनेबाबत महायुतीच्या मंत्र्याचं मोठं वक्तव्य, 'गरज पडल्यास..'.
खरी शिवसेना कोणाची? शिंदे की ठाकरेंची 'या' 51 जागांवर जनतेचा फैसला
खरी शिवसेना कोणाची? शिंदे की ठाकरेंची 'या' 51 जागांवर जनतेचा फैसला.
बारामतीत काका-पुतण्या कोण पॉवरफुल? या 40 जागा ठरवणार खरी राष्ट्रवादी
बारामतीत काका-पुतण्या कोण पॉवरफुल? या 40 जागा ठरवणार खरी राष्ट्रवादी.
महायुती-मविआमध्ये काँटे की टक्कर,मतदानानंतरच्या एक्झिट पोलचे आकडे काय?
महायुती-मविआमध्ये काँटे की टक्कर,मतदानानंतरच्या एक्झिट पोलचे आकडे काय?.
पोल ऑफ पोल, मतदानानंतर राज्यात कोणाची सत्ता येणार? कोणाचा अंदाज काय?
पोल ऑफ पोल, मतदानानंतर राज्यात कोणाची सत्ता येणार? कोणाचा अंदाज काय?.
राज्यात महायुती-मविआत काँटे की टक्कर, 'लोकशाही रुद्र'चा एक्झिट पोल काय
राज्यात महायुती-मविआत काँटे की टक्कर, 'लोकशाही रुद्र'चा एक्झिट पोल काय.