पुरुषांना 18 आणि स्त्रियांना 10 हेअरकट करण्याची परवानगी, ब्लू आणि टाईट जीन्स घातल्यास मृत्यूदंड; जाणून नॉर्थ कोरियातील अजब नियम
उत्तर कोरियामध्ये पुरुष आणि महिलांना केवळ 28 प्रकारचे केस कापण्याची परवानगी आहे. पुरुषांसाठी 18 प्रकारचे धाटणी आणि महिलांसाठी 10 प्रकारचे हेअरकट आहेत.
नॉर्थ कोरिया : जगातील प्रत्येक देशाचे आपले काही नियम आहेत. प्रत्येक देशात आणि देशातील प्रत्येक राज्याचे कायदे वेगळे आहेत. पण तुम्ही कधी अशा कायद्याबद्दल ऐकले आहे का ? निळी किंवा घट्ट जीन्स (Jeans) घालणे हा गंभीर गुन्हा (Crime) आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, जगातील सर्वात गुप्त देशांपैकी एक असलेल्या उत्तर कोरियामध्ये ब्लू जीन्स आणि घट्ट जीन्स घालण्यावर पूर्णपणे बंदी आहे. चुकूनही कोणी या बंदीच्या विरोधात गेले तर त्याला फाशी (Execution)ची शिक्षा दिली जाते.
घट्ट जीन्स घातल्यास फाशीची शिक्षा
उत्तर कोरियाच्या हुकूमशहाने आपल्या देशात अनेक हास्यास्पद नियम केले आहेत. या नियमांमध्ये निळ्या आणि घट्ट जीन्सवर बंदी देखील समाविष्ट आहे. हा नियम मोडल्यास गुन्हेगाराला फाशीची शिक्षा होते. किम जोंगच्या नजरेत या चुकीला माफी नाही.
आपल्या मर्जीने केसही कापू शकत नाही
उत्तर कोरियामध्येही कुणीही आपल्या मर्जीने केस देखील कापू शकत नाही. उत्तर कोरियामध्ये पुरुष आणि महिलांना केवळ 28 प्रकारचे केस कापण्याची परवानगी आहे. पुरुषांसाठी 18 प्रकारचे धाटणी आणि महिलांसाठी 10 प्रकारचे हेअरकट आहेत. याव्यतिरिक्त हेअरकट केल्यास गुन्हेगाराला थेट मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाते.
हुकूमशाहाच्या मताशी सहमत नसणाऱ्यांना फाशी
घट्ट पँट हे अश्लीलतेचे लक्षण असल्याचे इथला हुकूमशहा किम जोंग मानतो. त्यामुळे येथील 20 ते 30 वयोगटातील तरुणांना अशा पँट न घालण्याची सक्त ताकीद देण्यात आली आहे. जर कोणी असे कपडे घातलेले दिसले, तर त्याला ताबडतोब अटक केली जाते आणि त्याच्याकडू पुन्हा असे कधीही करणार नाही, असे लिहून घेतले जाते. यानंतरही जर कोणी सहमत नसेल तर त्याला फाशीची शिक्षा दिली जाते. सर्वप्रथम हा आदेश महिलांना लागू करण्यात आला होता.
इंटरनेट बंदी
संपूर्ण जग डिजिटल युगात वावरत असताना, उत्तर कोरियातील जनतेला मात्र इंटरनेटचा वापर करण्याची अजिबात परवानगी नाही. येथील हुकूमशहाने इंटरनेटच्या वापरावर पूर्णपणे बंदी घातली आहे. तथापि, हुकूमशहाने कामासाठी आणि शिकण्यासाठी फक्त 2G चा वापर करण्याची परवानगी दिली आहे. तसेच या देशात कोणीही पाश्चात्य संगीतही ऐकू शकत नाही.