पैसेवाल्यांचा माज, महामारीत हायफाय लग्नाचं रिसेप्शन, कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर राजकीय दबाव टाकण्याचा प्रयत्न

इचलकरंजीत एका श्रीमंत कुटुंबाने लॉकडाऊनचे नियम पायदडी तुडवत लग्नाच्या रिसेप्शनचा भव्य कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमात तब्बल 300 लोक सहभागी झाले (Wedding reception held in Ichalkaranji city in violation of lockdown rules).

पैसेवाल्यांचा माज, महामारीत हायफाय लग्नाचं रिसेप्शन, कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर राजकीय दबाव टाकण्याचा प्रयत्न
महामारीत हायफाय लग्नाचं रिसेप्शन, कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर राजकीय दबाव टाकण्याचा प्रयत्न
Follow us
| Updated on: Jun 08, 2021 | 5:37 PM

कोल्हापूर (इचलकरंजी) : कोरोना गरीब, श्रीमंत असा काहीच भेद बघत नाही. तरीही पासपोर्ट धारकांनीच कोरोना भारतात आणला हेही तितकंच खरं आहे. मात्र, त्याची झळ गरीब रेशनकार्ड धारकांपर्यंत पोहोचली आहे. गरीब असो किंवा श्रीमंत, शेवटी माणूस महत्त्वाचं. याच माणुसकीची जाणीव ठेवून केंद्र आणि राज्य सरकार, प्रशासन, डॉक्टर, नर्सेस, पोलीस स्वत:च्या जीवाची पर्वा न करता दिवस-रात्र झटत आहेत. मात्र, याची जाणीव काही श्रीमंतांना दिसत नाही. इचलकरंजीत एका श्रीमंत कुटुंबाने लॉकडाऊनचे नियम पायदडी तुडवत लग्नाच्या रिसेप्शनचा भव्य कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमात तब्बल 300 लोक सहभागी झाले (Wedding reception held in Ichalkaranji city in violation of lockdown rules).

नेमकं प्रकरण काय?

इचलकरंजी शहरातील राज कँसल हाँटेलमध्ये नियमांचे उल्लंघन करुन लग्नाचा रिसेप्शनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये सुमारे 300 नागरिक सहभागी झाले. या कार्यक्रमाबाबत माहिती मिळताच गांवभाग पोलीस ठाणे आणि इचलकरंजी पालिका प्रशासनाने संयुक्त कारवाई केली. कार्यक्रमाच्या आयोजकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. हे प्रकरण मिटवण्यासाठी पोलीस आणि नगरपालिकेवर राजकीय नेत्यांचा दावा मोठ्या प्रमाणात येत होता. इचलकरंजी शहरातील या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे (Wedding reception held in Ichalkaranji city in violation of lockdown rules).

इचलकरंजीत कोरोना परिस्थिती चिंताजनक

इचलकरंजी शहरात अजूनही कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढून बाधित रुग्णांची संख्या चिंताजनक ठरत आहे. अशा परिस्थितीत शासनाच्या निर्बंधाचे काटेकोर पालन होण्यासाठी प्रशासनाने मोठी कंबर कसली आहे. असे असतानाच आज मंगळवारी दुपारी शहरातील सांगली रोडवर असणाऱ्या राज कँसेल या हाँटेलमध्ये शेख आणि कापशी या दोन्ही कुटुंबामध्ये झालेल्या लग्नाचा रिसेप्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये सुमारे 300 नागरिक उपस्थित होते.

पोलीस कारवाईसाठी गेले आणि उपस्थितांची तारांबळ

नियमांचे उल्लंघन होवून सुरु असलेल्या या कार्यक्रमाची माहिती मिळताच गांवभाग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्यासह पालिकेचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यामुळे उपस्थितांची चांगलीच तारांबळ उडाली. यावेळी पोलीस आणि पालिका प्रशासनाच्या पथकाने कार्यक्रम संयोजकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला. या कारवाईने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

पोलिसांना कारवाई न करण्यासाठी राजकीय नेत्यांचे फोन

विशेष म्हणजे संबंधित हॉटेलवर आणि आयोजकांवर कारवाई होऊ नये, यासाठी पोलीस नगरपालिका प्रशासनावर बऱ्याच राजकीय नेत्यांचे फोन आणि दबावतंत्र येत होते. याला न जुमानता पोलीस प्रशासन आणि नगरपालिका प्रशासनाने या विवाह सोहळा करणाऱ्या शेख आणि कापशी परिवाराला दंड ठोठावला आहे. शासनाने सध्या लग्न सोहळ्यांसाठी काही निर्बंध लागू केले आहेत. केवळ 25 लोकांमध्ये विवाह सोहळा करण्याचे आदेश प्रशाशनाने दिले आहेत.

हेही वाचा : सर्वसामान्यांना बोलण्यात गुंतवायचे, संधी साधून ऐवज पळवायचे, 24 लाखांचे हिरे घेऊन पळालेली टोळी अखेर जेरबंद

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.