भांडण सोडवायला गेली अन् नाक कापून आली… कुठे घडली ही घटना? बातमी वाचाल तर…
दोघांच्या भांडणात तिसऱ्याचं नाक कापलं; ऐकावं ते भयंकरच
मध्यप्रदेश : नवरा बायकोच्या भांडण (Husband and wife fight) सोडवायला कोणी जात नाही. परंतु मध्यप्रदेशात (Madhya pradesh) भांडण सोडवायला गेलेली महिला जबर जखमी झाली आहे. त्या महिलेला जवळच्या रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आलं आहे. मांडवा गावातील जोडप्यामध्ये भांडण लागलं होतं. त्यावेळी नवरा आपल्या पत्नीला दगड फेकून मारहाण करीत होता. त्यावेळी भांडण सोडवायला गेलेल्या महिलेचं नाक फॅक्चर झालं आहे.
मध्यप्रदेशात मांडवा बुरहानपूरमध्ये एक आदिवासी गाव आहे. तिथं नवरा आणि बायकोमध्ये कडाक्याचं भांडण सुरु होतं. नवरा बायकोवरती दगडाने हल्ला करीत होता. त्याचवेळी भांडण सोडवायला गेलेल्या महिल्याच्या नाकावरती जोराचा दगड लागला आणि ती जखमी झाली. त्यामुळे जखमी महिलेला बुरहानपूर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
जखमी झालेल्या महिलेचं नाव सावित्री आहे. तिने सांगितलं शेजारी नवरा आणि बायको यांच्यात भांडणं सुरु होती. त्यावेळी त्याची बायको जीव वाचवण्यासाठी आमच्या घरी आली. त्यावेळी मी त्याच्या त्याच्या बायकोला वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु रुप सिंह याने मारलेला दगड माझ्या नाकावर लागल्याचं सांगितलं. सध्या महिलेवरती उपचार सुरु आहेत.