मोठी बातमी! पश्चिम बंगालमध्ये टीएमसी नेत्यासह तिघांवर गोळीबार, तिघेही जागच्या जागी खल्लास
TMC Leader Shot Dead News : स्वपन माझी आणि त्यांच्या दोन साथीदारांवर बेछुट गोळीबार (Firing Crime News) केला आणि त्यांची हत्या केली.
पश्चिम बंगालमध्ये (West Bengal News) गोळीबाराच्या घटनेनं खळबळ माजली आहे. एका टीएमसी नेत्यासह (TMC Leader shot dead) तिघांवर अदाधुंद गोळीबार करण्यात आला. या गोळीबारामध्ये टीएमसी नेत्यासह तिघांचा जागच्या जागी मृत्यू झाला आहे. दक्षिण 24 परगना जिल्ह्यात ही गोळीबाराची घटना घडली. या तिहेरी हत्याकांडांने पश्चिम बंगालचं राजकारण ढवळून निघालंय. अज्ञात हल्लेखोरांनी बाईकवरुन जात असलेल्या स्वपन माझी आणि त्यांच्या दोन साथीदारांवर बेछुट गोळीबार (Firing Crime News) केला आणि त्यांची हत्या केली. या घटनेनंतर आता परिसरात तणाव आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास करण्यास सुरुवात केली आहे. तसंच तिन्ही मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी टीएमसी नेत्याची गोळ्या छाडून हत्या करण्यात आल्यानं आता अनेक सवाल उपस्थित झालेत.
नेमकं काय घडलं?
दक्षिण 24 परगना जिल्ह्यातील टीएमसी नेते स्वपन माझी हे आपल्या दोघा साथीदारांसह जात होता. यावेळी रस्त्यात दुचाकीवरुन अज्ञाल हल्लेखोरांनी त्यांच्या दिशेने बंदूक ताणली आणि अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात स्वपन माझी यांच्यासह इतर दोघांनाही या गोळीबारात गंभीर जखमा झाल्या आणि त्यांचा यात जीव गेला. या गोळीबारानंतर दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी घटनास्थळावरुन पळ काढला. आता हल्लेखोरांचा पोलिसांकडून शोध घेतला जातोय.
पोलीस तपास सुरु
पोलिसांनी या घटनेनंतर परिसरात पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ केली आहे. नाकाबंदी देखील करण्यात आली असून हल्लेखोरांना पकडण्यासाठी प्रयत्नही सुरु केलेत. हल्लेखोरांना पकडून त्यांना कठोरातली कठोर शिक्षा केली जावी, अशी मागणी आता जोर धरु लागली आहे. तर या या घटनेचा टीएमसीच्या नेत्यांनी तीव्र शब्दांत निषेध केलाय.
सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
बंगालमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. 4 जुलै रोजी ममता बॅनजी यांच्या दक्षिण कोलकाता येथील कालीघाट निवासस्थानी एक व्यक्ती घुसला होता. रात्रभर हा व्यक्ती मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या घरातच लपून राहिला होता. ही घटना उघडकीस आल्यानंतर ममता बॅनर्जी यांच्या निवासस्थानी असलेल्या सुरक्षा व्यवस्थेवरही सवाल उपस्थित झाले होते.
संरक्षक भिंतीला पार करत हा अज्ञात इसम ममतांच्या निवासस्थान परिसरात घुसल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर टीएमसी नेत्यांवरच गोळीबाराची घटना घडल्यानंतर टीएमसी नेत्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलाय.