दोघा तरुण लेकरांचे घरात मृतदेह, पोलीस येताच आई दार लॉक करुन निघाली, अपघात की घातपात?

| Updated on: Mar 02, 2022 | 12:33 PM

प्रथमदर्शनी आनंदिताचा मृत्यू चार दिवसांपूर्वी झाल्याचं दिसतं, तर एका दिवसापूर्वी अभिरुपने अखेरचा श्वास घेतल्याचा अंदाज आहे. ड्रग्ज ओव्हरडोसमुळे दोघांचा मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे

दोघा तरुण लेकरांचे घरात मृतदेह, पोलीस येताच आई दार लॉक करुन निघाली, अपघात की घातपात?
कोलकातामध्ये दोघा भावंडांचे घरात मृतदेह
Follow us on

कोलकाता : एकाच घरात दोन तरुण भावंडांचे मृतदेह (Dead Body) सापडल्याचं दृश्य मंगळवारी कोलकाता पोलिसांना पाहायला मिळालं. 30 वर्षांची  आनंदिता आणि तिचा 20 वर्षांचा भाऊ अभिरुप यांच्या पार्थिवांच्या शेजारी 51 वर्षांची आई माला कौंच बसून होती. पश्चिम बंगालमधील कोलकाता शहरात (Kolkata) हा भयाण घटना समोर आली आहे. पती निधनानंतर मुलांसोबत राहणारी ही महिला पोलिसांना असंबद्ध उत्तरं देत होती. पोलिसांनी महिलेला आरजी कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल केले आहे. तर दोन्ही मुलांचे मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. दोन्ही मुलांच्या मृत्यूची वेळ आणि नेमकं कारण त्यानंतरच स्पष्ट होईल.

काय आहे प्रकरण?

प्रथमदर्शनी आनंदिताचा मृत्यू चार दिवसांपूर्वी झाल्याचं दिसतं, तर एका दिवसापूर्वी अभिरुपने अखेरचा श्वास घेतल्याचा अंदाज आहे. ड्रग्ज ओव्हरडोसमुळे दोघांचा मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मंगळवारी सकाळी शेजाऱ्यांना दुर्गंधी येऊ लागल्यानंतर त्यांनी कानोसा घेतला, तेव्हा माला कौंच आपल्या घराबाहेर दिसल्या. शेजाऱ्यांनी त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी टाळून घराचा दरवाजा बंद केला. त्यामुळे शेजाऱ्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.

घरात दोन मुलांचे मृतदेह

काही वेळातच न्यू टाऊन पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी माला यांनी घराला कुलूप लावून निघून जाण्याचा प्रयत्न केला. इतक्यात त्यांच्या हातून चावी खाली पडली आणि हीच संधी साधत पोलिसांनी दार उघडलं. आत जाऊन पाहिल्यावर बेडरुममध्ये दोन्ही मुलांचे मृतदेह आढळले. आनंदिताच्या अंगावर मोजके कपडे होते, तर अभिरुपच्या शरीरावर ब्लँकेट पांघरलं होतं.

डिसेंबर 2020 पासून हे कुटुंब दरमहा 15 हजार रुपये भाड्यावर राहत होतं. महिलेने पतीच्या निधनानंतर तिची मालमत्ता विकल्याची माहिती आहे. तिहेरी कुटुंबातील कोणीही नोकरी-व्यवसाय करत नव्हतं. बचतीच्या व्याजावरच त्यांचा उदरनिर्वाह सुरु असल्याचं बोललं जातं. मार्च 2021 पासून त्यांच्या वागण्यात विचित्रपणा आला होता. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात भाडेकरार संपल्यानंतर त्यांनी भाडं देणंही बंद केलं होतं.

संबंधित बातम्या :

सुट्टीवर आलेल्या CRPF जवानाचा आनंद क्षणात लोपला, सिमेंटचा पिलर कोसळून लेकीचा करुण अंत

गवताच्या गंजीत होरपळून एकाचा मृत्यू; नाशिकमधली काळजाचा थरकाप उडवणारी घटना

 देव तारी त्याला कोण मारी…! रस्त्यावर धावणाऱ्या लेकराला मृत्यू चाटून गेला, एक सेकंदाचा उशीर आणि…