ही कसली माया ! जन्मापासून एक कान नसल्यामुळे मुलीची हत्या, आई-वडिलांना पाहा न्यायालयाने काय दिली शिक्षा
पोलिसांनी दोघांची चौकशी केली, दोघांच्या उत्तरामध्ये विसंगी आढळून आल्याने पोलिसांनी दमदाटी करुन चौकशी केली. त्यावेळी दोघांनी हा गुन्हा केल्याचं कबूल केलं आहे. न्यायालयात दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
इंदोर : मध्यप्रदेशात (madya pradesh) एक भयानक घटना (crime news) उघडकीस आली आहे, त्यामुळे अनेकांना मोठा धक्का बसला आहे. जन्मजात मुलाला एक कान नसल्यामुळे त्याची हत्या केल्याचं प्रकरण उजेडात आलं आहे. त्यामुळे पोलिसांनी (indore police) त्या चिमुकलीच्या आई-वडिलांना ताब्यात घेतलं आहे. त्या मुलाची हत्या केल्यानंतर त्या मुलाचा मृतदेह कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकण्यात आला होता. काल त्यांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. पोलिसांनी सांगितलं की, या प्रकरणात मुलीची हत्या केली म्हणून वडील पप्पू रावल (50) आणि त्याची आई संगीता रावल (45) यांना न्यायालयात जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
त्या मुलीला कचऱ्याच्या कुंडीत फेकून दिले
हे प्रकरण २०१६ मधील आहे. जन्मलेल्या मुलीला कान नसल्यामुळे जन्म दिलेल्या आईने वडीलांच्या मदतीने तिची हत्या केली. त्यावेळी ती मुलगी फक्त तीन महिन्याची होती. मुलीच्या डोक्यात कायतरी मारल्याने तिचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांनी त्या मुलीला कचऱ्याच्या कुंडीत फेकून दिले होते. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर मुलीच्या आई-वडिलांचा शोध लागला. त्यानंतर मुलीच्या आई वडीलांचा शोध लागला.
गुन्हा केल्याचं कबूल केलं
पोलिसांनी दोघांची चौकशी केली, दोघांच्या उत्तरामध्ये विसंगी आढळून आल्याने पोलिसांनी दमदाटी करुन चौकशी केली. त्यावेळी दोघांनी हा गुन्हा केल्याचं कबूल केलं आहे. न्यायालयात दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
अनेक प्रकरणांमध्ये आतापर्यंत शिक्षा सुध्दा…
देशात आतापर्यंत लहानमुलांची हत्या झाल्याची अनेक प्रकरण उजेडात आली आहेतय. त्याचबरोबर अनेकदा आई-वडिलांनी मारहाण केल्याची सुद्धा प्रकरण उजेडात आली आहेत. अनेक प्रकरणांमध्ये आतापर्यंत शिक्षा सुध्दा झाली आहे.