Bihar News : पोलिस अधिकारी पिकअपने दारु पुरवठा करतोय, अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडल्यानंतर…
बिहार राज्यात दारुबंदी आहे, परंतु एक पोलिस दारु पुरवठा करीत असल्याचे उजेडात आले आहे. त्या पोलिसाकडे ९०० लीटर दारु सापडली आहे.
बिहार : बिहार (BIHAR) राज्यात दारुबंदी आहे. पाजणे, तयार करणे आणि विकण्याला सुध्दा बंदी आहे, असं सगळं असताना सुध्दा बिहार राज्यात दारुची तस्करी (liquor ban in Bihar) सुरु असल्याचे अनेकदा उघडकीस आले आहे. मागच्या काही दिवसांपासून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात दारुचा साठा सापडला आहे. सध्या बिहारमध्ये एका पोलिसावरती दारु विक्रीचा आरोप लावण्यात आला आहे. राज्यात ची जबाबदारी पोलिसांवरती आहे. त्या पोलिस अधिकाऱ्यासोबत चार पोलिस कर्मचारी लोकांना विक्रीसाठी दारु पुरवत असल्याचा आरोप आहे. बिहार राज्यातील वैशाली जिल्ह्यातील (Bihar Vaishali) हा प्रकार आहे. शनिवारी रात्री ज्यावेळी दारुबंदी पथकाने धाड टाकली, त्यावेळी हे प्रकरण उजेडात आला.
दारुबंदी पथकाने दारुचा एक पिकअप ताब्यात घेतला आहे. त्याचबरोबर दारुविक्री करणाऱ्या पाच लोकांना सुद्धा ताब्यात घेतलं आहे.
दारुबंदी असताना सुध्दा काही पोलिस अधिकाऱ्यांच्या मदतीने दारु लोकांना पुरवत असल्याची माहिती दारुबंदी पथकाला मिळाली. ज्यावेळी ही माहिती समजली, त्यावेळी पथकाने त्यांच्या हलचाली वाढवल्या. त्याचबरोबर संबंधित सगळ्या लोकांना रंगेहात ताब्यात घेतलं. ९०० लिटर दारु सापडली आहे. सराय पोलिस स्टेशनचा एक अधिकारी आणि चार कर्मचारी या प्रकरणात सापडले आहेत. पटनाच्या दारुबंदी पथकाने सगळ्यांना ताब्यात घेतलं आहे. ज्यावेळी कारवाई झाली, त्यावेळी एक पोलिस कर्मचारी इकडे तिकडे धावत होता. त्याला पथकाने पाठलाग करुन ताब्यात घेतलं आहे.
दुसऱ्या दिवशी त्या जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक रविरंजन कुमार या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलिस स्टेशनमध्ये गेले होते. सापडलेली दारु नष्ठ करण्याचं काम सुरु आहे. 3700 लीटर नष्ठ केली आहे. त्याचबरोबर पोलिस स्टेशनमध्ये 900 लीटर दारु आहे. ही दारु नष्ठ का केली नाही याची चौकशी सुरु केली आहे. दोषी आढळलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांवरती कारवाई सुरु केली आहे.