धुळवडीच्या कार्यक्रमात मित्राचा काटा काढला, तो रंग उधळत असतांनाच मित्रांनी जे काही केलं ते भयंकर होतं, नेमकं काय घडलं ?
नाशिकच्या देवळाली कॅम्प परिसरात घडलेल्या घटनेवरून खळबळ उडाली आहे. आठ जणांच्या विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
नाशिक : नाशिकमध्ये होळीच्या सणाला गालबोट लागलेले असतांना दुसऱ्या दिवशी धूळवड साजरी करत असताना देवळाली कॅम्प परिसरात तरूणावर हल्ला ( Nashik Crime News ) झाला होता. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाल्याची बाब समोर आली होती. तरुणाला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ( Nashik Police ) ठाण्यात हत्येचा प्रयत्न असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकूण आठ जणांच्या विरोधात हा गुन्हा दाखल असून संशयित आरोपी सध्या फरार आहे. साहिल संतोष वायदंडमे असं हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून सध्या प्रकृती स्थिर आहे.
नाशिकच्या देवळाली कॅम्प पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हाडोळा परिसरात राहणाऱ्या साहिल संतोष वायदंडमे या तरुणावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. धुळवडीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमातच हा हल्ला झाला आहे.
साहिल संतोष वायदंडमे याच्यावर झालेल्या हल्ल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. साहिल च्या डोक्यावर धारधार शस्राने वार केल्याने त्यात तो गंभीर जखमी असून त्याचेवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
साहिल संतोष वायदंडमे याच्यावर हल्ला करणारे गणेश उमाप, करण उमाप, गबऱ्या रोकडे, शाम दोदे, मधुकर दोंदे, आशू ऊर्फ नण्या दोदे, वंशिता दोंदे यांच्या विरोधात देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देवळाली कॅम्प पोलिसांकडून संशयित आरोपींचा शोध घेतला जात असून या हल्यामागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी जुन्या वादातून हा हल्ला झाला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे.
त्यामुळे संशयित आरोपी ताब्यात घेतल्यावर तपासात काय निष्पन्न होते हे पाहणं महत्वाचे ठरणार असून शहरातील खून आणि हल्ल्याच्या घटना लागोपाठ घडल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.