हौसेने गाडी घेतली, नियम तोडला, ई-चलन आले आणि बँक खाते झाले रिकामी

ऑनलाइन सेवांचा लाभ मिळवून देतो असे सांगून अनेक वाहन चालकांची फसवणूक करण्यात आली आहे. या वाहन चालकांना बनावट ई-चलन संदेश पाठविण्यात आलेत.

हौसेने गाडी घेतली, नियम तोडला, ई-चलन आले आणि बँक खाते झाले रिकामी
CRIME NEWSImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Sep 22, 2023 | 7:36 PM

मुंबई : 22 सप्टेंबर 2023 | मोठ्या हौसेने गाडी घेतली. वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करून गाडी चालवतो. पण, कधी तरी हातून चूक घडतेच आणि दंडाची रक्कम भरण्याचा संदेश मोबाईलवर झळकतो. त्याखाली एक लिंक दिसते. दंड रक्कम भरायची म्हणून त्यावर क्लिक करतो आणि काही क्षणातच आपले बँक खाते रिकामी झाल्याचे कळते. सायबर चोरांनी आता फसवणुकीचा हा नवा फंडा शोधून काढला आहे. कुणाला शंकाही येणार नाही असे बनावट ई चलनाचा संदेश आणि वेबसाईट या हॅकर्सनी तयार केली आहे.

भारतात दिवसेंदिवस सायबर घोटाळे वाढतच आहेत. सायबर माफिया वेगवेगळ्या कुल्प्त्या शोधून काढत आहेत. ऑनलाइन सेवांचा लाभ मिळवून देतो असे सांगत अनेक ग्राहकांची त्यांनी फसवणूक केली आहे. आता या सायबर माफियांनी फसवणुकीचा एक नवा मार्ग अवलंबिला आहे. फसवणुकीचा हा नवीन प्रकार आता समोर आला आहे. या माध्यमातून ते वाहन चालकांची फसवणूक करत असल्याचे उघडकीस आले आहे. चक्क परिवहन विभागाची बनावट वेबसाइट तयार करून सायबर माफियांनी आतापर्यंत अनेक वाहन चालकांची फसवणूक केलीय.

ऑनलाइन सेवांचा लाभ मिळवून देतो असे सांगून अनेक वाहन चालकांची फसवणूक करण्यात आली आहे. या वाहन चालकांना बनावट ई-चलन संदेश पाठविण्यात आलेत. विशेष म्हणजे परिवहन विभागाची बनावट वेबसाईट तयार करून त्यावरून हे ई-चलन संदेश पाठविण्यात आले आहेत.

हे सुद्धा वाचा

काय आहे बनावट ई-चलन घोटाळा?

हा घोटाळा करणारे वाहन चालकांना ट्रॅफिक पोलिसांसारखेच मजकूर संदेश पाठवतात. आपण रहदारीचे उल्लंघन केले त्यासाती आपणास दंड भरावा लागेल, असा मजकूर या संदेशात असतो. दंड भरण्यासाठी हे घोटाळेबाज एक लिंक देतात. या लिंकवर जाऊन दंड भरण्याची सूचना वाहन धारकाला केली जाते.

घोटाळेबाज यांनी दिलेल्या त्या लिंकवर क्लिक करताच परिवहन विभागासारखीच दिसणारी एक बनावट बेवसाईट ओपन होते. येथे चालकांना त्याची वैयक्तिक, आर्थिक माहिती विचारली जाते आणि दंड रक्कम भरण्यास सांगितले जाते.

सायबर गुन्हेगारांनी पाठवलेल्या याच लिंकवरून हॅकर्स वाहन चालकांच्या नकळत त्यांच्या मोबाइलवर नियंत्रण मिळवितात. काही वेळातच चालकाचे बँक खाते आणि मोबाईलमधील सर्व डाटा ते हॅक करतात.

ई – चलन घोटाळा कसा टाळाल?

टेक्स्ट मेसेजमध्ये आलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नये हाच सायबर गुन्हे करणाऱ्यांपासून वाचण्याचा उपाय आहे. एकदा तुम्ही या बनावट वेबसाइटवर वैयक्तिक आणि आर्थिक माहिती दिली की तुमचे बँक खाते रिकामी झालेच म्हणून समजावे.

जर असा संदेश आला आणि तुम्ही कोणत्याही वाहतूक नियमाचे उल्लंघन केले नसेल तर तुम्हाला त्याकडे दुर्लक्ष करावे लागेल. कदाचित अजाणतेपणी तुमच्या हातून अशी चूक घडली असेल थेट वाहतूक पोलिस विभागाशी संपर्क साधून दंडाची रक्कम विचारू शकता. जोपर्यंत तुम्ही ट्रॅफिक पोलिस अधिकाऱ्याशी बोलत नाही तोपर्यंत कुणासही कोणतेही पैसे देण्याची गरज नाही.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.