ज्यांच्यासाठी घाटकोपर पोलीस स्टेशनबाहेर मोठा हंगामा ते मौलाना सलमान कोण? मुंबई ते गुजरातपर्यंत वाद

| Updated on: Feb 05, 2024 | 9:47 AM

junagadh hate speech case : मौलाना मुफ्ती सलमान अजहरी यांनी 31 जानेवारीला जुनागढच्या मैदानात एका कार्यक्रमाला संबोधित केलं होतं. त्यावेळी त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. रविवारी त्यांना ताब्यात घेतल्याच समजल्यानंतर घाटकोपर पोलीस स्टेशनबाहेर हजारोंचा जमाव जमला होता. मात्र, त्या गर्दीमधून ATS ने त्यांना आपल्यासोबत गुजरातला नेलं.

ज्यांच्यासाठी घाटकोपर पोलीस स्टेशनबाहेर मोठा हंगामा ते मौलाना सलमान कोण? मुंबई ते गुजरातपर्यंत वाद
maulana mufti salman azhari
Follow us on

junagadh hate speech case : मुंबईच्या घाटकोपर भागातून मौलाना मुफ्ती सलमान अजहरी यांना अटक करण्यात आली आहे. गुजरातच्या जुनागढमध्ये प्रक्षोभक भाषण देण्याचा आरोप त्यांच्यावर आहे. मौलानाच्या अटकेला विरोध करण्यासाठी रविवारी घाटकोपर पोलीस स्टेशनबाहेर हजारोंचा जमाव जमला होता. काहीवेळाने मौलाना मुफ्ती सलमान अजहरी यांनी स्वत: जमावाला शांतता राखण्याच आवाहन केलं. घटनास्थळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला. गुजरात ATS ने मौलाना मुफ्ती सलमान अजहरी यांना अटक केली. त्यांना गुजरातला नेण्यात आलं आहे.

मौलाना मुफ्ती सलमान अजहरी यांच्यावर कलम 153ए, 505, 188 आणि 114 अंतर्गत आरोप आहे. कोणीही जोशमध्ये येऊन संयम सोडू नका, अस आवाहन मौलाना अजहरी यांनी केलं. “मी गुन्हेगार नाहीय. मला कुठल्या गुन्ह्यासाठी इथे आणलेलं नाहीय. ते आवश्यक चौकशी करतायत आणि मी त्यांना सहकार्य करतोय. माझ्या नशिबात लिहील असेल, मला अटक झाली, तर त्यासाठी सुद्धा मी तयार आहे” असं मौलाना अजहरी यांनी म्हटलं.

आधी कोणाला अटक झाली?

मुंबईचे इस्लामिक स्कॉलर अजहरी यांनी 31 जानेवारीला जुनागढच्या मैदानात एका कार्यक्रमाला संबोधित केलं होतं. त्यावेळी त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांच्या भाषणाचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. वाद वाढल्यानंतर पोलिसांनी FIR नोंदवला. एफआयआरमध्ये दोन आयोजकांचीही नाव आहेत. त्यांना पोलिसांनी आधीच अटक केलीय. आता मौलानाला अटक झालीय.

कोण आहेत मुफ्ती सलमान अजहरी?

मुफ्ती सलमान अजहरी एक सुन्नी इस्लामिक रिसर्च स्कॉलर आणि मोटिवेशनल स्पीकर आहेत. त्यांनी इस्लामिक स्टडीसाठी इजिप्तच्या जामिया अल-अजहरमधून ग्रॅज्युएशनची पदवी घेतलीय. जगभरात त्यांचे हजारो समर्थक आणि फॉलोअर्स आहेत. इस्लामिक भाषण देण्यासोबतच ते अनेक धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात. त्याशिवाय ते जामिया रियाजुल जन्नाह, अल-अमान एजुकेशन एंड वेलफेयर ट्रस्ट आणि दारुल अमानचे संस्थापक आहेत.