कोण आहे ही खासदार आणि लेडी डाँन अभिनेत्री? जिने तब्बल 429 बँक कर्मचाऱ्यांना फसवलं?

होय ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अभिनय करता करता ती राजकारणात आली आणि खासदारही झाली. देशातले लाखो लोक तिचे फॅन्स आहेत. पण याच खासदार झालेल्या अभिनेत्रीने तब्बल ४२९ लोकांची फसवणूक करून त्यांना २८ कोटींना गंडा घातलाय.

कोण आहे ही खासदार आणि लेडी डाँन अभिनेत्री? जिने तब्बल 429 बँक कर्मचाऱ्यांना फसवलं?
CRIME NEWS Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Aug 03, 2023 | 8:23 PM

पश्चिम बंगाल : देशात रिअल इस्टेट क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. मात्र, आपल्या कष्टाचे पैसे गुंतवून स्वप्नातील घरे खरेदी करणाऱ्यांची फसवणुक होत असलेच्या अनेक घटना समोर येत असतानाच कलकत्ता येथूनही एक मोठी घटना समोर आली आहे. 7 सेन्स इंटरनॅशनल नावाच्या रिअल इस्टेट कंपनीने अपार्टमेंट विकण्याच्या नावाखाली हा मोठा घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी एका भाजप नेत्याने अंमलबजावणी संचालनालय (ईडी) कडे केली आहे.

फसवणुकीचे हे प्रकरण चर्चेत येण्याचे कारण म्हणजे बांगला फिल्म स्टार आणि खासदार नुसरत जहाँ. 7 सेन्स इंटरनॅशनल कंपनीसोबत खासदार नुसरत जहाँ यांचे कनेक्शन असल्याचे समोर आले आहे. तशी तक्रार भारतीय जनता पक्षाचे नेते शंकुदेव पांडा यांनी ईडीकडे केली आहे.

हे सुद्धा वाचा

नुसरत जहाँ या तृणमूल काँग्रेसच्या खासदार आहेत. भाजप नेते पांडा यांनी नुसरत जहाँ या 7 सेन्स इंटरनॅशनल रिअल इस्टेट कंपनीच्या संचालक होत्या. या कंपनीने 2014 मध्ये इंडियन ओव्हरसीज बँकेच्या 429 कर्मचाऱ्यांना कलकत्ता शहराबाहेर फ्लॅट देण्याचे आश्वासन दिले. अपार्टमेंटच्या बदल्यात त्यांनी प्रत्येक कर्मचाऱ्यांकडून 5.5 लाख रुपये घेतले. मात्र, अजूनही कोणत्याही कर्मचाऱ्याला फ्लॅट दिला नाही.

7 सेन्स इंटरनॅशनल रिअल इस्टेट कंपनीने पैसे घेतले. आठ वर्ष उलटून गेल्यानंतरही त्या कर्मचाऱ्यांना फ्लॅट मिळाला नाही. त्यामुळे त्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. हे प्रकरण न्यायालयात गेले. परंतु, भाजप नेते पांडा यांनी थेट ईडीकडे हे प्रकरण नेत खासदार नुसरत जहाँ यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तृणमूल काँग्रेसच्या खासदार आणि अभिनेत्री नुसरत जहाँ यांनी 28 कोटी रुपयांची फसवणुक केली असा आरोप त्यांनी केला आहे.

दरम्यान, खासदार नुसरत जहाँ यांनी हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे अधिक बोलण्यास नकार दिला. या प्रकरणावर न्यायालय निर्णय घेईल. माझ्यावरील आरोप निराधार असून माझा त्या घटनेशी काहीही संबंध नाही असे म्हटले आहे.

मी बँकेकडून 1.18 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते ते मे 2017 मध्ये व्याजासह फेडले होते. मात्र, 7 सेन्स इंटरनॅशनल रिअल इस्टेट कंपनीशी काहीही संबंध नाही. आपले म्हणणे मी या आधी मांडले असते पण शूटिंगमध्ये व्यस्त असल्यामुळे काही बोलता आले नव्हते असेही त्यांनी स्पष्ट केले.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.