वकील अजय श्रीवास्तव यांनी दाऊदची संपत्ती का विकत घेतली ? सांगितले मोठे कारण

कुख्यात डॉन दाऊद इब्राहीमची जमीन आणि घर विकत घेणारे वकील अजय श्रीवास्तव यांनी आता रत्नागिरीतील आंब्याची बाग देखील विकत घेतली आहे. मला त्यासाठी शेतकरी व्हावे लागले. त्यामुळे आपण शेतकरी झालो. दाऊदची संपत्ती विकत घेतल्याने मला 11 वर्षे झेड प्लस सिक्युरिटी होती असे त्यांनी म्हटले आहे. आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी आपण हे केल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

वकील अजय श्रीवास्तव यांनी दाऊदची संपत्ती का विकत घेतली ? सांगितले मोठे कारण
dawood Ibrahim
Follow us
| Updated on: Jan 07, 2024 | 3:37 PM

मुंबई | 7 जानेवारी 2024 : आंतरराष्ट्रीय दहशदवादी कुख्यात दाऊद इब्राहिम याच्या मालकीच्या संपत्तीचा लिलाव 5 जानेवारी रोजी झाला. दोन भूखंडांसाठी कोणी बोली लावली नाही. आणखी एक जागेची रिझर्व्ह प्राईस केवल 15 हजार रुपये होती. त्याला तब्बल  2 कोटीच्या बोलीत खरेदी करण्यात आले आहे. हा प्लॉट वकील अजय श्रीवास्तव यांनीच खरेदी केला आहे. याआधी श्रीवास्तव यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या तीन संपत्ती लिलावात बोली लावून विकत घेतल्या आहेत. ज्यात रत्नागिरीतील खेड तालुक्याच्या मुंबके गावातील दाऊदच्या बालपणीच्या घराचा देखील समावेश आहे.

साल 2001 रोजी वर्तमान पत्रात वाचले की दाऊदच्या जमीनीचा लिलाव होत आहे. परंतू लोक बोली लावण्यासाठी पुढे येत नसल्याचे मला समजले. मला कळाले की लोक घाबरुन पुढे येत नाहीत असे वकील अजय श्रीवास्तव यांनी म्हटले. तेव्हा आपण ठरविले की आपण पुढे जाऊन दहशतवाद्याची ही जमीन विकत घ्यावी. नंतर आपण पुढे आल्यानंतर लोकही बोलीसाठी हळूहळू पुढे आले आणि भीती संपून गेली. साल 2001 रोजी जेव्हा मी संपत्ती विकत घेतील तेव्हा मला धमक्या आल्या होत्या. त्यानंतर 11 वर्षे मला झेड प्लस सुरक्षा मिळाली होती. 3 – 4 वर्षांपूर्वी दाऊदने त्याच्या वकीलामार्फत माझ्याशी संपर्क साधला होता आणि या संपत्तीला पुन्हा त्यालाच विकण्याची त्याने गळ घालत, हवे तेवढे पैसे सांगा असा सल्ला दिला होता. परंतू त्यास मनाई करीत, पैसा कमाविणे हा माझा उद्देश्य नसल्याचे त्यास आपण सांगितल्याचे श्रीवास्तव म्हणाले.

जाणीवपूर्वक मोठी बोली लावली

साल 2020 मध्ये दाऊदचा खानदानी घर खरेदी केले. या घरात जसा मदरसे काम करतात तशी मुलांना शिकविण्यासाठी हिंदू पाठशाला तयार करण्यासाठी आपण सनातन धर्म पाठशाला ट्रस्टची स्थापना केल्याचे अजय श्रीवास्तव यांनी सांगितले. आपण जी जमीन विकत घेतली आहे ती या बंगलावजा घराजवळच आहे. त्यात हॉस्टेल बनविण्याची योजना आहे. आजूबाजूच्या सर्व जागा मी विकत घेतल्या आहेत. आता थोडीशी ही जमीन राहीली होती. त्यामुळे मी जाणीवपूर्वक इतकी मोठी बोली लावली की कोणीच ती लावू नये. अन्यथा उर्वरित जमीन वाया गेली असती असेही त्यांनी सांगितले.

मी शेतकरी देखील झालो

हा बंगला साल 2020 रोजी घेतला परंतू डिपार्टमेंटच्या चुकीने घराचा क्रमांक योग्य न मिळाल्याने रजिस्ट्रेशनला उशीर झाला. त्यास योग्य करायलाच दोन वर्षे लागली. तसेच आपण एक आंब्यांची बागही विकत घेतली आहे. त्यांनी सांगितले की तुम्हाला शेतकरी व्हावे लागेल. मग मी शेतकरी झालो आणि ही आंब्याची बाग विकत घेतली. सनातन धर्म पाठशाला ट्रस्ट अंतर्गत मुलांना शिकविण्याच्या माझ्या हेतूसाठी मी हे सर्व केल्याचे त्यांनी सांगितले. मी कामाला देशप्रेमाचे काम मानतो. अशा दहशतवाद्याची भीती संपायला हवी आणि यात मी यशस्वी झालो आहे, कारण लोक आता दाऊदची संपत्ती विकत घेण्यासाठी पुढे येत आहेत. मला दाऊदला हरवायचे आहे. तो जेथे असेल तेथे मी देखील असेल असे वकील अजय श्रीवास्तव यांनी म्हटले आहे.

Non Stop LIVE Update
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.