Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुनेच्या विवाह बाह्य संबंधाला वैतागून सासऱ्याचे टोकाचे पाऊल, सून आणि प्रियकराला ट्रॅक्टरखाली चिरडलं

विधवा सुनेच्या विवाह बाह्य संबंधाला वैतागून सासऱ्याने मुलाकरवी सून आणि तिच्या प्रियकराला ट्रॅक्टरखाली चिरडून टाकल्याची घटना घडली.

सुनेच्या विवाह बाह्य संबंधाला वैतागून सासऱ्याचे टोकाचे पाऊल, सून आणि प्रियकराला ट्रॅक्टरखाली चिरडलं
Follow us
| Updated on: Oct 30, 2020 | 11:57 AM

जालना : विधवा सुनेच्या विवाह बाह्य संबंधाला वैतागून सासऱ्याने सून आणि तिच्या प्रियकराची (Widow Daughter In Law Murder) हत्या केल्याची घटना जालन्यात घडली. सासऱ्याने ही हत्या अपघात असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रियकराने मृत्यूपूर्वी आईला खरी हकिगत सांगितली आणि सासऱ्याचं बिंग फुटलं. या प्रकरणी सासरा आणि दुसऱ्या मुलाला ताब्यात घेण्यात आलं आहे (Widow Daughter In Law Murder).

विधवा सुनेच्या विवाह बाह्य संबंधाला वैतागून सासऱ्याने मुलाकरवी सून आणि तिच्या प्रियकराला ट्रॅक्टरखाली चिरडून टाकल्याची घटना घडली. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील चापडगाव शिवारत ही धक्कादायक घटना घडली.

भागवत प्रल्हाद हरबक आणि मारिया विनोद लालझरे अशी मृतांची नावं आहेत. मारियाच्या पतीने दहा वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. भागवत हे लालबावटा संघटनेचे चापडगावचे अध्यक्ष होते. बुधवारी संघटनेचा कुंभारपिंपळगावला मेळावा होता. त्यामुळे भागवत आणि मारिया हे दोघे दुचाकीवर मेळाव्याला गेले. पण, दीड तासानंतर भागवतच्या दुचाकीचा अपघात झाला, अशी बातमी कुटुंबियांना समजली.

जखमी अवस्थेत भागवतला रुग्णालयात घेवून जाताना त्याने आईला सांगितले की विकास बथवेल लालझरे याने मुद्दामहून आमच्या अंगावर ट्रॅक्टर घातला. त्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तर मारियाचा रुग्णालयात नेतानाच मृत्यू झाला होता.

भागवतच्या आईच्या तक्रारीवर मारियाचा सासरा बथवेल आणि मुलगा विकास यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांनाही ताब्यात घेतलं आहे.

Widow Daughter In Law Murder

संबंधित बातम्या :

विक्रोळीत भांडणातून सुरक्षा रक्षकाला बांबूने जबर मारहाण, उपचारादरम्यान मृत्यू

जुलैमध्ये मैत्री, ऑगस्टमध्ये लव्ह मॅरेज, ऑक्टोबरमध्ये हत्या

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.