मित्राला घेऊन नवऱ्याकडे गेली… गोड गोड बोलू लागली, म्हणाली, बाबू…; आता सरकारी अधिकारी घामाघूम
जबलपूरमधील एका महिलेने तिच्या प्रियकरासोबत मिलिभगत करून तिच्या नवऱ्याची 38 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून तिने पतीकडून पैसे उकळले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आणि दागिने जप्त केले आहेत.

मध्यप्रदेशातील जबलपूर जिल्ह्यात नुकताच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एक महिलेने तिच्याच नवऱ्यासोबत हेराफेरी केल्याची घटना घडली आहे. या महिलेने मित्राशी हातमिळवणी करून नवऱ्याला सरकारी नोकरी लावण्याच्या नावाखाली नवऱ्यालाच 38 लाख रुपयांचा गंडा घातला. हा प्रकार उघड झाल्यानंतर पत्नी आणि तिच्या मित्राविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मदन महल पोलीस तपास करत आहेत. पोलिसांनी या प्रकरणी अनेक वस्तू जप्त केल्या आहेत.
मदन महल पोलीस ठाण्याच्या परिसरात आदित्य मिश्रा हे त्याची पत्नी पूजा सोबत राहतात. पूजाने तिचा कथित चुलत भाऊ आकाश नेमा याच्याशी संगनमत करून हा फसवणूक केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असता आकाश हा पूजाचा चुलत भाऊ नसून मित्र असल्याचं उघड झालं आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा खोलात तपास केला असता आकाशने मिळालेल्या पैशातून लग्झरी कार खरेदी केल्याचं उघड झालं आहे.




काय आहे प्रकरण?
पत्नीने मित्राच्या साथीने नवऱ्याची 38 लाखाची फसवणूक केली. आधी नवऱ्याला सरकारी नोकरी लावण्याचं जाळं पसरलं. पत्नीने नवऱ्याला बाबू, जानू म्हणत सरकारी नोकरीला लागण्यासाठी भरीस घातलं. त्यानंतर तिने आकाश आपला चुलत भाऊ असल्याचं सांगून सासूरवाडीच्या लोकांशी ओळख करून दिली. त्यानंतर तिने क्लास टूची नोकरी लावण्याचं आश्वासन देऊन नवऱ्याकडून तीन वर्षात सुमारे 38 लाख रुपये वसूल केले. एवढेच नव्हे तर लग्नात मिळालेले वडिलोपार्जित दागिनेही तिने गायब केले. पण नोकरी काही मिळाली नाही. तीन वर्ष होऊनही नोकरी मिळत नसल्याने वैतागलेल्या नवऱ्याने जेव्हा पैसे मागायला सुरुवात केली, तेव्हा त्यांनी टाळाटाळ करण्यास सुरुवात केली.
वेळ जसा जात होता, तशी आदित्यला नोकरी मिळत नव्हती. तसेच हातातून गेलेल्या पैशाचं पुढे काय झालं? तेही कळायला मार्ग नव्हता. आदित्य जेव्हा आकाशकडे पैसे मागायला गेला तेव्हा पैसे खर्च झाल्याचं सांगून आकाशने हात झटकले. पैसे मिळणं मुश्किल असल्याचंही त्याने स्पष्ट केलं. त्यामुळे संतापलेल्या आदित्यने मदन महल पोलीस ठाण्यात पत्नी पूजा आणि आकाशच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली. चौकशीत जी जी माहिती समोर आली, त्याने पोलीस अधिकारी घामाघूमच झाले.
आकाश आणि पूजाने गोड बोलून आदित्यकडून 38 लाख रुपये उकळले. घरातील दागिनेही जप्त केले. त्या पैशातून ऐषोराम केला. लग्झरी कार खरेदी केली. पोलिसांनी या दोघांना अटक करून पोलिसी खाक्या दाखवताच दोघेही पोपटासारखे बोलायला लागले. पोलिसांनी या दोघांकडून 29 लाख रुपयाचे 29 तोळे सोने जप्त केले. तसेच या आधी 6 तोळे सोने, एक लाख रुपयांची रोकड आणि एक वेन्यू कार जप्त केली. हे सर्व दागिने आरोपींनी एका फायनान्स कंपनीत ठेवले होते.