CRIME NEWS : रॉकेल टाकून आईला आणि पत्नीला पेटवलं, गावकऱ्यांनी सांगितलं कारण…

आपल्या बायकोला आणि आईला रॉकेल टाकून पेटवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गामस्थांना सुध्दा या घटनेचा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे फरार मुलाचा शोध पोलिस घेत आहेत.

CRIME NEWS : रॉकेल टाकून आईला आणि पत्नीला पेटवलं, गावकऱ्यांनी सांगितलं कारण...
jharkhand policeImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 16, 2023 | 1:51 PM

झारखंड : राज्यात एक धक्कादायक घटना (crime news) घडली आहे. ही घटना घडल्यापासून शेजारी सुध्दा घाबरले आहेत. विशेष म्हणजे आरोपीने ज्यावेळी हे कृत्य केलं, तेव्हापासून तो फरार आहे. पोलिस (jharkhand police) त्याचा शोध घेत आहेत. आदल्या दिवशी बायकोशी कडाक्याचं भांडणं केलं. दुसऱ्या दिवशी तिच्या अंगावर रॉकेल ओतलं. पेटलेल्या बायकोला विझवण्यासाठी आई गेली, तर तिच्याही अंगावर रॉकेल ओतलं. दोन्ही महिला घरात ओरडत राहिल्या. काहीवेळाने आरोपीने त्या घरातून पळ काढला. तिथल्या लोकांनी दोघींना सुध्दा जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस (two woman death) घटनास्थळी दाखल झाले. ही घटना झारखंड राज्यातील चतरा गावात घडली आहे.

हे प्रकरण चतरा जिल्ह्यातील सुरहीबागी गावातील आहे. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या गावात राहणारा व्यक्ती कुलदीप दांगी हा सनकी होता. आदल्या दिवशी त्याने पत्नीसोबत कडाक्याचं भांडणं केलं. त्यानंतर आरोपीने आपल्या पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतलं आणि आग लावली. बायको जोरात ओरडू लागल्याने तिला वाचवण्यासाठी आरोपीची आई तिथं गेली. आई बायकोला वाचवत असल्याचे पाहून त्याने आईवरती सुध्दा रॉकेल ओतलं आणि पेटवून दिलं. या प्रकरणात दोन्ही महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

काहीवेळाने तिथून आरोपी फरार झाल्याची माहिती मिळाली आहे. आरोपी निघून गेल्यानंतर शेजारच्या लोकांनी त्या महिलांची आग विझवली आणि त्यांना रुग्णालयात दाखल केलं. बायकोला डॉक्टरांनी उपचारापूर्वीचं मृत्यू झाल्याचं सांगितलं, तर आईचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले आहेत. दोन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन झाल्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत.

हे सुद्धा वाचा

पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला आहे. शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्या व्यक्तीला दोन मुलं आहेत. त्यामध्ये एक मुलगा दीड वर्षाचा आहे, तर मोठी मुलगी तीन वर्षाची आहे. दोन्ही माहेरच्या लोकांनी ताब्यात घेतली आहेत. आरोपीला लवकरचं ताब्यात घेणार असल्याचं पोलिसांनी जाहीर केलं आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.