लिपस्टिकने भिंतीवर लिहून काढली पतीच्या अत्याचाराही कहाणी, मग गळफास घेत विवाहितेची आत्महत्या

Suicide or Murder : धक्कादायक बाब म्हणजे चंदा आणि दिलीप यांना दोन मुलंही झाली होती. आपल्या दोन्हीही चिमुरड्या मुलांसह गळफास घेण्याचा प्रयत्न केला. पण...

लिपस्टिकने भिंतीवर लिहून काढली पतीच्या अत्याचाराही कहाणी, मग गळफास घेत विवाहितेची आत्महत्या
धक्कादायाक...Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 11, 2022 | 1:20 PM

झारखंडच्या (Jharkhand News) रांचीमध्ये एका दाम्पत्याचा थरारक किस्सा समोर आला आहे. पत्नीने गळफास घेत आत्महत्या (Wife Suicide) केली. त्याआधी तिने दर्दभरी अत्याचाराची कहाणी चक्क लिपस्टिकने (Lipstick) भिंतीवर लिहून काढली होती. ज्या घरात विवाहीत तरुणीने आत्महत्या त्या घराच्या चारही भिंतीवर आपल्या मृत्यूचं कारण उघड करत या तरुणीने जीव दिलाय. विवाहितेच्या आत्महत्येनं परिसरात खळबळ माजलीय. सासरचे लोक आणि पती यांना जबाबदार धरत तरुणीने आत्महत्या करत असल्याचा आरोपा केला आहे. आत्महत्या केलेल्या तरुण विवाहितेचं नाव चंदा चौहान असं असल्याचं समोर आलंय. झारखंडच्या रांची पासून 70 किलोमीटर दू असलेल्या खराली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घडना घडल्याचं समोर आलं आहे. चंदाच्या मृत्यूने तिच्या आई-वडील आणि माहेरच्या लोकांना मोठा धक्का बसला असून त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. 2019 साली चंदा आणि दिपील यांचा प्रेमविवाह झाला होता. लग्नानंतर सगळं सुरळीत सुरु होतं. पण नंतर दोघांत छोट्या छोट्या गोष्टींवरुन वाद सुरु झाला होता.

का केली आत्महत्या?

दिलीप आणि चंदा यांचं एकमेकांवर प्रेम होतं. त्यातून नंतर त्यांनी एकमेकांसोबत आयुष्य घालवण्याचं वचन दिलं होतं. संसार सुरु झाला होता. सीसीएलमध्ये कामाला असलेल्या दिलीपसोबत चंदाचे लग्नानंतरचे सुरुवातीचे दिवस अगदी आनंदात गेले. पण लग्नानंतरच्या नवलाईननंतर खटके उडू लागले. वाद वाढले. पती-पत्नीमधील वाद टोकाला जाऊन दिलीप चंदाला मारहाण करु लागला. तिला शिविगाळ करु लागला.

आपला निर्णय चुकला, असं चंदाला राहून राहून वाटू लागलं होतं. अखेर वैतागून तिने आपल्या आत्महत्येची दर्दभरी कहाणी लिहून काढली. ज्या खोलीत तिनं आत्महत्या केल्या, तिथल्याच चारही भिंतीवर तिने लिपस्टिकने आपल्यासोबत कसा छळ केला गेला, कशी मारहाण केली गेली आणि पती आपल्याला कशी शिविगाळ करत होता, यावर सनसनाटी आरोप केलेत.

हे सुद्धा वाचा

धक्कादायक बाब म्हणजे चंदा आणि दिलीप यांना दोन मुलंही झाली होती. आपल्या दोन्हीही चिमुरड्या मुलांसह गळफास घेण्याचा प्रयत्न केला. पण शेजारील लोकांना या मुलांच्या किंकाळ्या ऐकून घराकडे धाव घेतली. दरवाजा तोडून मुलांना वाचवलं. पण चंदाला वाचवण्यात यश येऊ शकलं नाही. पण खोलीत गेल्यावर जेव्हा लोकांची आजूबाजूच्या भिंती पाहिल्या, तेव्हा ते हादरुनच गेले.

चंदाने भिंतीवर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये आपल्या पतीवर आणि सासरच्या लोकांना गंभीर आरोप केले होते. आता याप्रकरणाची दखल पोलिसांनी घेतली असून सासू सासरे आणि मृत चंदाच्या नवऱ्याची कसून चौकशी केली जातेय. हत्या आणि आत्महत्या अशा दोन्ही संशयाखाली पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....