‘नवऱ्याला संपवा आणि…’ पतीच्या हत्येसाठी पत्नीने WhatsApp वरून दिली सुपारी..
सध्या सोशल मीडियाचा वापर प्रचंड वाढला आहे, त्याचा उपयोगही तितकाच होतो म्हणा. पण याच सोशल मीडियाचा एक धक्कादायक पद्धतीने वापर करण्यात आल्याची खळबळजनक घटनादेखील समोर आली आहे. वादामुळे माहेरी राहणाऱ्या पत्नीने थेट ऑनलाइन माध्यमातून पतीच्या हत्येची सुपारीदेखील दिली.
सध्या सोशल मीडियाचा वापर प्रचंड वाढला आहे, त्याचा उपयोगही तितकाच होतो म्हणा. पण याच सोशल मीडियाचा एक धक्कादायक पद्धतीने वापर करण्यात आल्याची खळबळजनक घटनादेखील समोर आली आहे. खरंतर उत्तर प्रदेशातील आग्रामध्ये पती-पत्नीच्या भांडणांचा विचित्र प्रकार समोर आला. या वादामुळे माहेरी राहणाऱ्या पत्नीने थेट ऑनलाइन माध्यमातून पतीच्या हत्येची सुपारीदेखील दिली. एवढंच नव्हे तर व्हॉट्सॲपवर एक स्टेटस ठेवून पतीची हत्या करणाऱ्या व्यक्तीला 50 हजार रुपयांचं बक्षीस देखील जाहीर केलं. मात्र पतीने, पत्नीचं हे स्टेटस पाहिलं आणि त्याला घामच फुटला. भेदरलेल्या पतीने थेट पोलिसांत धाव घेत मदतीची याचना केली .
पीडित पतीने त्याच्या पत्नीच्या मित्रावर धमकी दिल्याचा आरोपही केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे धक्कादायक प्रकरण आग्रा येथील बह पोलीस स्टेशन परिसरातील आहे. याप्रकरणी फिर्यादीने पोलिसांत धाव घेत तक्रार केली. 9 जुलै 2022 रोजी त्याचे मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यातील एका तरुणीशी लग्न झाले होते. लग्नानंतर दोघांमध्ये मतभेद झाले. त्यामुळे पत्नी भांडली आणि ती त्याच वर्षी डिसेंबर महिन्यात तिच्या माहेरी, भिंड येथे गेली. एवढंच नाही तर पत्नीने भिंड न्यायालयात भरणपोषणाचा दावाही दाखल केला. यामुळे पतीला कोर्टाच्या तारखांसाठी भिंड येथे जावे लागले.
दरम्यान, 21 डिसेंबर 2023 रोजी कोर्टाच्या तारखेवरून परतत असताना सासरच्यांनी त्यांच्याच जावयाला जीवे मारण्याची धमकी दिली. तेवढ्यातच त्या विवाहीत महिलेने आता कालच तिच्या व्हॉट्सॲप स्टेटसवर पतीला मारण्यासाठी सुपारी दिली. ‘माझ्या इच्छेविरुद्ध लग्न झाले आहे. जो कोणी माझ्या पतीची हत्या करेल त्याला 50 हजार रुपयांचे बक्षीस दिले जाईल’, असे पत्नीने तिच्या स्टेटसवर लिहीले होते.
पोलिसांनी गुन्हा दाख
या प्रकरणी तरुणाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धमकी आणि माहिती तंत्रज्ञान कायदा 2008 च्या कलम 67 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. पीडितेची पत्नी आणि तिच्या कुटुंबीयांचीही चौकशी केली जाणार आहे, असं पोलिसांनी सांगितलं.