नवरा-बायकोचं असं काय झालं की नवऱ्याने बायकोला थेट दवाखान्यातच धाडलं, नेमकं काय घडलं?

पती-पत्नीचा काही कारणातून वाद झाला. या वादाचे हाणामारीत पर्यावसन झाले. याच रागातून पतीने जे केले त्याने गावात एकच खळबळ माजली.

नवरा-बायकोचं असं काय झालं की नवऱ्याने बायकोला थेट दवाखान्यातच धाडलं, नेमकं काय घडलं?
कौटुंबिक वादातून पतीकडून पत्नीवर हल्लाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 07, 2023 | 4:33 PM

सोलापूर / सागर सुरवसे : अक्कलकोट तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कौटुंबिक वादातून नवऱ्याने बायकोचा कान उपटून काढल्याची घटना दोन दिवसापूर्वी घडली आहे. या घटनेत पत्नी जखमी असून, तिच्यावर अक्कलकोट येथील शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सोलापूर शासकीय रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी अक्कलकोट पोलिसांनी आरोपी नवऱ्याला अटक केली आहे. अंबजप्पा जमादार असे आरोपी पतीचे नाव आहे. या घटनेचा पुढील तपास अक्कलकोट दक्षिण पोलीस स्टेशनचे अधिकारी करत आहेत.

किरकोळ वादाचे हाणामारीत पर्यावसन झाले

अक्कलकोट तालुक्यातील उटगी गावात नवरा आणि बायकोचा किरकोळ वाद झाला होता. त्यानंतर वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. त्या मारहाणीत चिडलेल्या नवऱ्याने रागाच्या भरात आपल्या पत्नीचा कान धरून जोराने ओढल्याने पत्नीचा कानच फाटून बाजूला झाला. विजयालक्ष्मी जमादार असे या गंभीर जखमी झालेल्या पत्नीचे नाव आहे.

नवऱ्याच्या पत्नी गंभीर जखमी

नवऱ्याने रागाच्या भरात केलेल्या हल्ल्यात विजयालक्ष्मी जमादार या गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमी विजयालक्ष्मी यांच्यावर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, आरोपी पती अंबजाप्पा जमादार याच्यावर भादवी 325 कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला असून, पोलिसांनी आरोपी अंबजप्पाला अटक केली आहे.

हे सुद्धा वाचा

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.