पत्नीनं माहेरच्या लोकांना हाताशी घेऊन पतीचं…, व्हिडीओ पाहिल्यानंतर पोलिसांना घाम फुटला

| Updated on: Sep 01, 2023 | 10:59 AM

सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यामध्ये पत्नीने आपल्या पतीचं अपहरण केल्याची नोंद पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाली आहे.

पत्नीनं माहेरच्या लोकांना हाताशी घेऊन पतीचं..., व्हिडीओ पाहिल्यानंतर पोलिसांना घाम फुटला
Crime news in marathi (2)
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

हरियाणा : सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक पत्नी आपल्या पतीला हाताला धरुन खेचून घेऊन जात असल्याची दिसत आहे. पत्नी आपल्या नवऱ्याला माहेरच्या लोकांना हाताशी धरुन घेऊन जात आहे. विशेष म्हणजे पत्नीने आपल्या नवऱ्यालासोबत नेले आहे. हा सगळा प्रकार तिथं असलेल्या सीसीटिव्हीत (CCTV Video) कैद झाला आहे. त्या व्हिडीओत दोन महिला आणि इतर लोकं दिसत आहेत. हा व्हिडीओ हरियाणा (hariyana crime news in marathi) राज्यातील पलवल जिल्ह्यातील आहे. हा प्रकार पोलिस स्टेशनमध्ये जेव्हा दाखल झाला, त्यावेळी पोलिसांना सुध्दा धक्का बसला होता.

हा सगळा प्रकार पतीच्या कुटुंबियांच्यासमोर झाला आहे. ज्यावेळी त्या व्यक्तीला तिची बायको तिथून घेऊन गेली, त्यावेळी तिथं सगळे उपस्थित होते. हा सगळा प्रकार पलवल जिल्ह्यातील होडलच्या सैनिक कॉलनीतील आहे. त्या व्यक्तीच्या भावाने याबाबत पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यांनी तक्रारीत म्हटलं आहे की, त्यांचा भाऊ हरिश आणि इतर घरचे सदस्य एकत्र होते. त्यावेळी हरिशची पत्नी आणि तिच्या माहेरची लोकं जबरदस्तीने घरी आली. ज्यावेळी पत्नी घरी आली, त्यावेळी पत्नी त्यांच्यासोबत हरिशला घेऊन गेली आहे. हरीशला पत्नी आणि माहेरच्या लोकांनी खेचून नेलं आहे. त्याचबरोबर हरीशला घेऊन ते लोकं फरार झाले आहेत.

ज्यावेळी हा प्रकार तिथल्या लोकांच्या लक्षात आला, त्यावेळी तिथल्या स्थानिकांनी लोकांच्या या प्रकरणाची सगळी माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी या प्रकरणाचं गांभीर लक्षात घेऊन एका ठिकाणी सापळा लावला. त्यावेळी अपहरण झालेल्या व्यक्तीची सुटका केली, त्याचबरोबर माहेरच्या लोकांना ताब्यात घेतलं. पोलिसांनी सांगितलं की, पती आणि पत्नीमध्ये मागच्या काही वर्षापासून वाद सुरु आहे. त्यामुळे मागच्या चार वर्षापासून दोघही विभक्त राहत आहेत. पोलिसांनी या प्रकरणात असलेल्या सगळ्या लोकांना ताब्यात घेतलं आहे. त्याचबरोबर त्यांच्यावर पुढील कारवाई सुरु आहे.

हे सुद्धा वाचा