पतीने स्मार्टफोन गिफ्ट केला, मात्र मोबाईलमुळे पत्नीने स्वतःला संपवले; वाचा नेमके काय घडले?
पती-पत्नीमध्ये रात्री उशिरापर्यंत भांडण सुरु होते. त्यानंतर ज्योतीने पतीसमोरच विष प्राशन केले. पत्नीला विष प्राशन करताना पाहून पती बेशुद्ध झाला. यानंतर कुटुंबातील लोकांनी तिला जिल्हा रुग्णालयात नेले.
ओडिसा : ओडिसामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पती वेळ नाही किंवा गिफ्ट देत नाही म्हणून पत्नीमध्ये वाद झालेले तुम्ही ऐकले असेल. मात्र पतीने गिफ्ट दिले म्हणून पत्नीने आत्महत्या (Suicide) केल्याची खळबळजनक घटना ओडिसात (Odisha) घडली आहे. मकलानगरी जिल्ह्यातील एमपीव्ही 14 गाव येथील एका महिलेने टोकाचे पाऊल उचलत विष प्राशन (Poison) करुन आपले आयुष्य संपवले. ज्योती मंडल असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे.
काय आहे प्रकरण?
एमपीव्ही गावातील रहिवासी कनहेई मंडल याचा अडीच वर्षापूर्वीच ज्योती हिच्याशी विवाह झाला होता. कनहेईने आपली पत्नी ज्योतीला ईएमआयवर मोबाईल घेऊन दिला. मात्र पत्नीला ईएमआयवर मोबाईल घेतल्याची माहिती ज्योतीला नव्हती.
फोन खूप महागडा होता. त्यामुळे फोनची सर्व रक्कम एकदम भरणे कनहेईला शक्य नव्हते. त्यामुळे ईएमआयवर मोबाईल खरेदी केला होता. त्याचे सर्व हफ्तेही भरले. हफ्ते पूर्ण झाल्यानंतर जेथून मोबाईल खेरदी केला होता ते लोक कागदपत्र घेऊन सही घ्यायला घरी आले.
यामुळे पत्नीला ईएमआयची माहिती मिळाली. यावरुन दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. ईएमआयवर मोबाईल घेतला हे आपल्यापासून लपवले म्हणून ज्योती चिडली आणि पतीसोबत भांडू लागली.
पतीसोबत भांडण झाल्यानंतर पत्नीची आत्महत्या
पती-पत्नीमध्ये रात्री उशिरापर्यंत भांडण सुरु होते. त्यानंतर ज्योतीने पतीसमोरच विष प्राशन केले. पत्नीला विष प्राशन करताना पाहून पती बेशुद्ध झाला. यानंतर कुटुंबातील लोकांनी तिला जिल्हा रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
पत्नीच्या मृत्यूमुळे मानसिक धक्का बसलेल्या पतीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी पोलिसांनी घटनेची नोंद करत पुढील तपास सुरु आहे.