आधी हत्या केली, मग किचनमध्ये कपडे जाळले, असं काय घडलं की पत्नीनेच पतीला एवढी भयंकर शिक्षा दिली?

पती दररोज दारु पिऊन यायचा. दारुच्या नशेत पत्नीला शिवीगाळ करत मारहाण करायचा. पतीच्या रोजच्या त्रासाला पत्नी कंटाळली होती. अखेर तिने टोकाचा निर्णय घेतला.

आधी हत्या केली, मग किचनमध्ये कपडे जाळले, असं काय घडलं की पत्नीनेच पतीला एवढी भयंकर शिक्षा दिली?
बेपत्ता तरुणीचा मृतदेह आढळला
Follow us
| Updated on: Jun 12, 2023 | 4:00 PM

दुर्ग : छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रोजच्या त्रासाला कंटाळून पत्नीने पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना सुपेला पोलीस ठाण्याअंतर्गत कृष्णा नगर परिसरात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पत्नीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करत तिला अटक केली आहे. कुटुंबीयांना पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलीस प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. दिलीप सोनी असे मयत पतीचे, तर संगीता सोनी असे आरोपी पत्नीचे नाव आहे.

‘अशी’ उघड झाली घटना

पतीची हत्या केल्यानंतर पत्नीने त्याचा मृतदेह बेडरुममध्ये पलंगावर सोडून किचनमध्ये कपडे जाळण्यासाठी गेली. यावेळी कुटुंबातील एका लहान मुलाने किचनमध्ये आग लागलेली पाहिली. आग पाहून मुलाने मयताच्या मोठ्या भावाला याबाबत सांगितले. यानंतर कुटुंबीयांनी तात्काळ दिलीपच्या घरी धाव घेतली. घरी जाऊन पाहतात तर भावाचा मृतदेह पलंगावर पडला होता.

कुटुंबीयांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत महिलेची चौकशी केली. मात्र महिलेने आधी पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच महिलेने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. पती नेहमी दारु पिऊन यायचा आणि मारहाण, शिवीगाळ करायचा. त्याच्या या त्रासाला कंटाळून पत्नीने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे महिलेने पोलिसांना सांगितले. यानंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. महिलेविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करत तिला अटक केली आहे.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर....
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर.....
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?.
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्.
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार.
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं.
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य.
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप.
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट.
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?.
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?.