पतीच्या रोजच्या त्रासाला कंटाळली होती, अखेर सहनशक्तीचा अंत झाला अन् महिलेने स्वतःच…

पती-पत्नीचे लग्न झाल्यापासूनच पटत नव्हते. दररोज दोघांची या ना त्या कारणातून भांडणं व्हायची. शेजारीही मध्यस्थी करुन दोघांची समजूत काढायचे. पण दोघेही ऐकत नव्हते. अखेर भांडणाचा भयंकर अंत झाला.

पतीच्या रोजच्या त्रासाला कंटाळली होती, अखेर सहनशक्तीचा अंत झाला अन् महिलेने स्वतःच...
क्षुल्लक कारणातून लिव्ह इन पार्टनरकडून महिलेची हत्याImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 06, 2023 | 9:31 PM

पश्चिम सिंगभूम : झारखंडमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रोजच्या भांडणाला कंटाळून महिलेने स्वतःचे कुंकू पुसल्याची घटना पश्चिम सिंगभूम जिल्ह्यात घडली. पतीची हत्या केल्यानंतर पत्नीने पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले आणि पोलिसांनाही याची माहिती दिली. महिलेने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवल्यानंतर पोलिसांनी पुढील तपास सुरु केला. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी पत्नीला अटक केली आहे. बुधराम सामद असे हत्या झालेल्या पतीचे नाव आहे. जिल्ह्यातील टोकलो पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अतिदुर्गम असलेल्या हातनबेडा गावात ही घटना घडली.

लग्न झाल्यापासून दोघांमध्ये भांडणे होत होती

मिळालेल्या माहितीनुसार, हातनबेडा गावातील 42 वर्षीय बुधराम समद यांचा काही वर्षांपूर्वी सीमा होनहागासोबत विवाह झाला होता. लग्न झाल्यापासून दोघांमध्ये वारंवार भांडणे होत होती. नेहमीप्रमाणे शुक्रवारी रात्रीही पती-पत्नीमध्ये वाद झाला. या भांडणातून पत्नीने धारदार शस्त्राने वार करून हत्या केली. यानंतर शनिवारी सकाळी महिलेने टोकलो पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले.

शेजारीही अनेकदा समजूत काढायचे

पती-पत्नीमध्ये नेहमी भांडणं व्हायची. शेजारीही दोघांना नेहमी समजावयचे. पण दोघेही ऐकायला तयार नव्हते. अखेर या भांडणाचा भयानक अंत झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच कल्लोळ माजला. पोलीस अधिक तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.