वडिल अचानक घरुन गायब झाले, मुलाने शोध घेतला तर धक्कादायक प्रकरण समोर

पती-पत्नीमध्ये रोज वाद व्हायचे. पती दररोज पत्नीला मारहाण करायचा. या वादातून पतीने जे केले त्याने गावात एकच खळबळ उडाली.

वडिल अचानक घरुन गायब झाले, मुलाने शोध घेतला तर धक्कादायक प्रकरण समोर
कौटुंबिक वादातून पत्नीने पतीला संपवले
Follow us
| Updated on: Jul 29, 2023 | 3:40 PM

पिलीभीत / 29 जुलै 2023 : पती-पत्नीमध्ये दररोज वाद व्हायचा. याच वादातून पत्नीने पतीची हत्या करुन मृतदेहाचा पाच तुकडे केले. हे तुकडे कालव्यात फेकून दिले. बाप बेपत्ता झाला म्हणून मुलाने पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास सुरु केला असता जे उघडकीस आले त्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. पोलिसांनी संशयित पत्नीला ताब्यात घेत चौकशी केली असता, तिने गुन्ह्याची कबुली दिली. मृतदेह अद्याप सापडला नसून, पोलीस मृतेदहाचा शोध घेत आहेत. रामपाल असे हत्या झालेल्या पतीचे नाव आहे. या घटनेमुळे उत्तर प्रदेशात एकच खळबळ उडाली आहे.

पती-पत्नीमध्ये वाद होते

गजरौला पोलीस ठाण्याअंतर्गत शिवनगर गावात रामपाल आणि त्याची पत्नी दुलारो देवी राहतात. रामपालचा मुलगा आपल्या पत्नी, मुलासह गावातच वेगळा राहतो. दुलारो देवीचे पतीसोबत नेहमी वाद व्हायचा. पतीच्या मित्रासोबतच दुलारोचे संबंध जुळले. ती त्याच्यासोबतच राहत होती. एक महिन्यापूर्वीच ती पतीकडे रहायला आली होती.

पतीची हत्या करुन तुकडे काव्यात फेकले

पती मारहाण करायचा, तसेच त्याने जमीनही गहाण टाकली होती. याच रागातून रविवारी रात्री दुलारोने पती खाटेवर झोपला असताना त्याला बांधले. मग त्याची हत्या करुन मृतदेहाचे 5 तुकडे केले आणि कालव्यात फेकले. त्यानंतर बुधवारी मुलाला बाप घरी नसल्याचं सांगितलं. मुलाने पोलिसात धाव घेत बाप बेपत्ता असल्याची तक्रार दिली. यानंतर पोलिसांनी बेपत्ता रामपालचा शोध सुरु केला. आई-वडिलांच्या भांडणाबाबत मुलाने पोलिसांना सांगितले. तसेच काही दिवसापूर्वीच ती घरी परत आल्याचेही बोलला.

हे सुद्धा वाचा

मुलाने दिलेल्या माहितीवरुन पोलिसांना दुलारोवर संशय आला. त्यांनी दुलारोला ताब्यात घेत तिची चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी तिला अटक केली आहे. पत्नीने दिलेल्या माहितीनुसार पोलीस कालव्यात मृतदेहाचा शोध घेत आहेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.