झारखंड : चतरा जिल्ह्यात एक खळबळजनक घटना घडली. या जिल्ह्यातील जयपूर गावात एका पत्नीने आपल्या पतीची हत्या करण्याचा प्रयत्न केला. दारु पिऊन पती मारहाण करतो म्हणून पत्नीने पतीचे हातपाय बांधले. त्यानतंर पतीच्या अंगावर रॉकेल ओतलं आणि त्याला जिवंत पेटवून दिलं. पतीला पेटवून दिल्यानंतर त्या खोलीचा दरवाजा बाहेरुन बंद करुन पत्नीने पळ काढला.
आगीच्या ज्वाळांमुळे होरपळलेल्या पतीने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. त्यानंतर गावातील लोक आरडाओरडा ऐकून या व्यक्तीला वाचवण्यासाठी धावले. तातडीने लोकांनी या व्यक्तीला बाहेर काढलं आणि रुग्णालयात दाखल केलं. आता व्यक्तीची अवस्था चिंताजनक असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
विनोद भारती नावाचा व्यक्ती पत्नी रुनती देवीसोबत जयपूर गावात राहत होता. विनोद हा दारु पिऊन रुनतीला सारखी मारहाण करायचा. नेहमीच तो नशेत असायचा. दारु पिऊन शिवीगाळ करायची, पत्नीला त्रास द्यायचा, असा प्रकार विनोद रुनतीसोबत करत होता. त्याची पत्नी रुनती पतीच्या छळाला प्रचंड वैतागली होती. त्यातूनच तिने एक धक्कादायक पाऊल उचललं.
विनोद झोपला होता, तेव्हा रुनतीने त्याचे हातपाय बांधले. त्यानंतर त्याच्या अंगावर चादर टाकली. त्यावर रॉकेल ओतलं आणि नंतर आग लावून दिली. नंतर घराचा दरवाजा बंद करुन ती स्वतः बाहेर निघून गेली.
आगीत होरपळलेल्या विनोदला जेव्हा शुद्ध आली तेव्हा तो आरडाओरडा करण्याशिवाय दुसरं काहीच करु शकत नव्हता. त्याचा आवाज ऐकूण आजूबाजूचे लोक मदतीसाठी धावले. त्यांना जखमी विनोद याला रुग्णालयात दाखल केलं. प्राथमिक उपचार केंद्रातून आता हजारीबाग येथील मेडिकल कॉलेजमध्ये विनोदवर उपचार सुरु आहेत. प्रचंड भाजला गेल्यानं सध्या त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
दरम्यान, स्थानिक पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. पत्नी रुनती देवी हिला पोलिसांनी अटक केली आहे. विनोद याने अनेकदा रुनतीवर हात उचलला होता. तिला जबर मारहाण केली असल्याचं गावातील लोकांनी पोलिसांना सांगितलंय. याआधाही रुनतीने पतीचा जीव घेण्यासाठी त्याच्या खाण्यात विष कालवलं होतं. पण त्यातून विनोद सुखरुप बचावला होता. अखेर आता पुन्हा एकदा कौंटुबिक वादातन रुनती हिने पतीचा जीव घेण्यासाठी धक्कादायक पाऊल उचललंय.