Wolri Hit & Run : महिलेला बेदरकारपणे चिरडणाऱ्या मिहीर शाहला मोठा झटका, काय होणार कारवाई ?

वरळीतील अपघातास जबाबदार असलेला मिहीर शाह याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून त्याला १६ जुलैपर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे. घटनास्थळावरही आरोपीला नेण्यात आलं आणि तपास करण्यात आला. आता याप्रकरणात आणखी एक मोठी अपडेट समोर आली असून मिहीर शाहला मोठा झटका बसला आहे.

Wolri Hit & Run : महिलेला बेदरकारपणे चिरडणाऱ्या मिहीर शाहला मोठा झटका, काय होणार कारवाई ?
Follow us
| Updated on: Jul 13, 2024 | 8:10 AM

रविवारी पहाटे वरळीत बीएमडब्ल्यूने दुचाकीला धडक दिली आणि एका महिलेला गाडीच्या चाकाखाली चिरडले. मुंबईतील हे हिट अँड रन प्रकरण सध्या भलतंच गाजत असून या अपघातास जबाबदार असलेला मुख्य आरोपी मिहीर शाह याला अपघातानंतर दोन दिवसांनी पोलिसांनी अटक केली. महिलेला चिरडून ठार केल्यानतंर फरार झालेला मिहीर हा मित्रांसह व आई-बहि‍णींसह लपून बसला होता. एका महिलेच्या नाहक झालेल्या मृत्यूमुळे वातावरण चांगलचं तापलं होतं. आणि या घटनेतील आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी करत विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते. संबधित आरोपी हा शिवसेना शिंदे गटाचे उपनेते राजेश शाह यांचा मुलगा असल्याते समोर आल्यावर तर या प्रकरणाला आणखीनच धार चढली. अखेर दोन दिवस अथक तपास केल्यानंतर पोलिसांनी मिहीरला त्याच्या मित्रांसह अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता १६ जुलैपर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

वाहन परवाना होणार रद्द

दरम्यान या घटनेप्रकरणी नवे अपडेट्स समोर आले आहेत. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी मिहीर राजेश शहा याचा आता वाहन परवाना रद्द होणार आहे. मिहीरचा वाहन परवाना रद्द करण्यासाठी वरळी पोलीस पाठपुरावा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला मिहीर राजेश शहा याच्याविरुद्ध वरळी पोलीस कडक कारवाई करत आहेत. रविवारी पहाटे दारुच्या नशेत गाडी चालवत असलेल्या मिहीरने ॲक्टिव्हाला धडक दिली, परिणामी कावेरी नाखवा यांचा गाडीखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे आता वरळी पोलिसांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयाला (आरटीओ) पत्र लिहून मिहिर शाहचा ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करण्याची विनंती करण्याचा विचार केला आहे.

हे सुद्धा वाचा

मिळालेल्या माहितीनुसार, त्याचा हा लायसन्स मूळत: पालघर आरटीओने जारी केला होता, तेव्हा मिहीर १९ वर्षांचा होता. याप्रकरणी पोलिसांच्या तपासात लक्षणीय प्रगती झाली आहे. दरम्यान मद्यपानाच्या सत्रादरम्यान उपस्थित मिहीरचे मित्र, जुहू बिअर बारमधील कर्मचारी आणि मालाडमधील दुकान मालक ज्यांच्याकडून मिहीरने दारू खरेदी केली होती अशा १३ जणांचे जबाब पोलिसांनी आत्तापर्यंत नोंदवले आहेत

त्या बारविरोधातही कारवाई

रविवारी पहाटे हा अपघात होण्यापूर्वी मिहीर व त्याचे मित्र जुहूमधील बारमध्ये पार्टी करत होते. त्याच बारमध्ये त्यांनी व्हिस्कीचे १२ पेग रिचवल्याचे समोर आले आहे. अपघाताच्या ४ तास आधी मिहीर शहा आणि मित्रांनी विस्कीचे १२ पेग प्यायल्याची माहिती उघड झाली आहे. मात्र आरोपी मिहीर शाह याला २५ वर्षे पूर्ण झालेली नसतानाही त्याला व्हिस्की देण्यात आली होती, म्हणूनच या बारवर कारवाई करण्यात आली होती. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईनंतर मुंबई महानगरपालिकेने बारवर तोडक कारवाई केली.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.