ज्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला, त्याच्याच सोबत पळून गेली, नवरा बसला बोंबलत; काय आहे नेमकं प्रकरण ?

पोलिस स्थानकात ज्याच्याविरोधात तक्रार दाखल करायला गेली होती, त्याच्यासोबतच ती महिला पळून गेल्याने कुटुंबियांना धक्का बसला. सासर-माहेरचे लोक तिच्यामागे धावत तिला थांबवायला गेले, पण तोपर्यंत...

ज्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला, त्याच्याच सोबत पळून गेली, नवरा बसला बोंबलत; काय आहे नेमकं प्रकरण ?
Follow us
| Updated on: Jun 12, 2023 | 11:15 AM

बरेली : येथे एक महिला पोलिस स्टेशनच्या गेटवरून त्याच इसमासोबत पसार झाली, ज्याच्याविरोधात ती तक्रार दाखल करायला चालली होती. या महिलेसह तिचा पती, सासरचे आणि माहेरचे लोकही उपस्थित होते. मात्र पोलिस स्थानकात आत जायच्या ऐवजी ती महिला सर्वांसमोरच त्या व्यक्तीच्या बाईकवर बसली आणि फरार झाली. सर्वजण पहातच राहिले.

महिलेचा पती, सासरचे आणि माहेरचे लोक तिला थांबवण्यासाठी तिच्या मागे हाका मारत गेले, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला. ती महिला कधीच पुढे निघून गेली.

फरीदापूर ठाणे क्षेत्रातील एका गावात राहणारी तरूणी लग्नाच्या बदायूं जवळील दातागंज क्षेत्रात गेली होती. तेथे राहणाऱ्या एका युवकाने त्या तरूणीचे काही अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. त्यामुळे भडकलेल्या सासरच्या लोकांनी तिला त्रास देण्यास सुरुवात केली. त्यानंतर ती तरूणी तिच्या माहेरी परतली.

शनिवारी ती महिला पती, सासरचे लोक आणि माहेरच्यांसोबत फरीदपूर पोलिस स्थानकात आरोपी तरूणाविरोधात तक्रार दाखल करण्यास पोलिसांकडे जात होती. तेथे जाऊन ती महिला आरोपी तरुणाचे आणि इतर दोन लोकांविरुद्ध सामूहिक बलात्काराची तक्रार नोंदवणार होती. त्याच वेळी आरोपी तरूण बाईक घेऊन त्या पीडितेजवळ पोहोचला. ती पोलिस स्टेशनला जायच्या आधीच महिला त्या आरोपी तरूणाच्या बाईकवर बसली आणि निघून गेली.

हे पाहून त्या महिलेचा पती, सासरचे आणि माहेरचे लोक तिला हाका मारत, ओरडत तिच्या मागे धावले. हे पाहून आजूबाजूच्या लोकांनीही त्या तरूणाचा आणि महिलेचा पाठलाग करण्यास सुरूवात केली. मात्र आरोपीने बाईकचा वेग वाढवला आणि कोणाच्याही हातात न सापडताच तो वेगाने पळून गेला.

या घटनेनंतर त्या तरूणीच्या आईने आरोपविरोधात अपहरणाची तक्रार नोंदवली. या प्रकरणाचा पुढी तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.