Mumbai Crime : अशी शातिर बायको नकोच देवा… नवऱ्याला गोड बोलून कोट्यवधीला ठकवले; का केलं असेल तिने असं ?
एका पत्नीने तिच्या पतीची फसवणूक करत त्याच्या सह्या घेतल्या. त्यानंतर तिने पतीच्या नावावर असलेली कोट्यावधींची मालमत्ता, स्वत:च्या नावावर करून घेतली. या ठकसेन महिलेला अखेर अटक करण्यात आली आहे.
मुंबई | 2 सप्टेंबर 2023 : पतीशी गोड -गोड बोलून , त्याला फसवून सह्या घेत त्याची कोट्यावधींची संपत्ती हडपणाऱ्या ठकसेन महिलेला (fraud) अखेर पोलिसांनी अटक केली आहे. 56 वर्षीय आरोपी महिलेने तिच्या 71 वर्षीय पतीची फसवणूक (crime news) केली. आणि त्याची सुमारे साडेतीन कोटींची मालमत्ता स्वत:च्या नावावर करून घेतली. अडीच वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेनंतर आरोपी महिला फरार होती. अखेर इतक्या दिवसांनी ओशिवरा पोलिसांनी तिला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रिजेंद्रपाल सिंग असे फिर्यादीचे नाव असून डिसेंबर 2019 ते डिसेंबर 2020, या काळात त्यांची तब्येत ठीक नव्हती. त्यांच्या आजारपणाचा फायदा घेऊन त्यांची पत्नी रेणू ब्रिजेंद्रपाल सिंग यांनी पॉवर ऑफ ॲटर्नी त्यांच्या नावे करण्यासाठी दबाव टाकला.
फसवून घेतल्या सह्या
ब्रिजेंद्रपाल सिंग हे अंधेरीतील लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये राहतात. त्यांची पत्नी रेणू हिने ब्रिजेंद्रपाल यांच्या बँकेचे सर्व हक्क, शेअर सेक्युरिटीज, ठिकठिकाणी केलेली गुंतवणूक, भागीदारीतील व्यवहार, तसेच जंगम आणि स्थावर मालमत्तेचे व्यवहार आणि इतर करार हे मिळवले. रेणू यांनी ब्रिजेंद्रपाल यांना फसवून त्यांच्या सह्या घेतल्या व त्यांची 3.61 कोटींची मालमत्ता स्वत:च्या नावे करून घेतली.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सिंग यांनी जानेवारी 2021 मध्ये पोलिसांकडे संपर्क साधला; मात्र, तोपर्यंत त्यांची पत्नी फरार झाली होती. अथक प्रयत्नानंतर पोलिसांनी आरोपी महिलेला नुकतीच अटक केली.