तिला कपडे बदलताना पाहिलं, दुसरीने टेलरला बेदम चोपलं, व्हिडीओ व्हायरल

उल्हासनगरमधील स्टेशन रोड परिसरात सोमवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. त्या परिसरात एक महिला कपडे खरेदी करण्यासाठी आलेली असताना तिथल्याच एका टेलरने तिला कपडे बदलताना पाहिलं, असा आरोप त्या महिलेने केला.

तिला कपडे बदलताना पाहिलं, दुसरीने टेलरला बेदम चोपलं, व्हिडीओ व्हायरल
महिलेची टेलरला मारहाण
Follow us
| Updated on: Dec 03, 2024 | 12:12 PM

महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्यानंतर प्रशासनाला प्रश्न विचारण्यात येतात. मात्र उल्हासनगरमध्ये एका महिलेने असे कृत्य करण्याचा प्रयत्न करणाऱ्या इसमाला चांगलाच धडा शिकवला. शहरात एका महिलेने टेलरला बेदम मारहाण करत त्याला चोप दिला. या टेलरने एका दुसऱ्या महिलेला कपडे बदलाताना पाहिल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र त्या महिलेऐवजी दुसऱ्या महिलेनेच त्याला चोप दिला. या संपूर्ण मारहाणीचा व्हिडीओ मोबाईलमध्ये कैद झाला असून तो व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. दरम्यान पोलसांनी मारहाण करणाऱ्या त्या महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.

भररस्त्यात मारहाण 

मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगरधील स्टेशन रोड परिसरात सोमवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. त्या परिसरात एक महिला कपडे खरेदी करण्यासाठी आलेली असताना तिथल्याच एका टेलरने तिला कपडे बदलताना पाहिलं, असा आरोप त्या महिलेने केला. मात्र त्या महिलेने त्यावर काहीच ॲक्शन घेतली नाही, उलट तिच्याऐवजी एका दुसऱ्याच महिलेने त्या टेलरला पकडून त्याला बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली, शिव्याही दिल्या. या  मारहाणीची , गोंधळाची बातमी समजताच पोलीस तिथे दाखल झाले. मात्र त्यांच्यासमोरही त्या महिलेची त्या टेलरला मारहाण सुरूच होती.

अखेर पोलिसांनी त्या महिलेला थांबवले आणि त्या टेलरला ताब्यात घेतलं. याबाबत मूळ पीडित महिलेने अद्याप पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार केलेली नसून टेलर जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. त्याच्या तक्रारीवरून मारहाण करणाऱ्या महिलेविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तर मूळ पीडित महिलेला तक्रार देण्यासाठी बोलावण्यात आलं असून तिच्याकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याचंही पोलिसांचं म्हणणं आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.