Woman beat bus driver : सोशल मीडियाच्या विश्वात रोज काही ना काही व्हिडिओ चर्चेत राहतात. सध्या असाच एक व्हायरल व्हिडिओ चर्चेत असून, त्यावरून जोरदार खळबळ उडाली आहे. व्हिडिओमध्ये एक महिला बस चालकाला मारहाण (Beating) करताना दिसत आहे. हा व्हिडिओ (Video) एका स्थानिक पत्रकाराने त्याच्या ट्विटर हँडलवर ट्विट केला आहे. ज्यामध्ये एका महिलेने (Women) बसच्या ड्रायव्हर सीटवर बसलेल्या पुरुषाला रागाने मारले. या मुद्द्यावर आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आणि कोणालाही कायदा हातात घेण्याचा अधिकार नसल्याचे सांगितले. हे प्रकरण आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील आहे. जिथे एक महिला चुकीच्या बाजूने जात असताना सरकारी बसने तिच्या स्कूटीला धडक दिली. त्यानंतर महिला बस चालकाला मारहाण करताना दिसत आहे. ड्रायव्हरची कॉलर धरून ती त्याच्यावर धमकावताना दिसत आहे.
ट्विटरवर शेअर
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की महिलेला ड्रायव्हरला ओढून बाहेर काढायचे होते, पण ड्रायव्हर स्वतःचा बचाव करताना दिसत आहे. दरम्यान, महिलेने बसमध्येच चालकाला बेदम मारहाण केली. हा व्हिडिओ आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी ट्विटरवर शेअर केला असून त्यासोबत त्यांनी कॅप्शन लिहिले आहे, की महिलेने ड्रायव्हरला मारहाण करणे पूर्णपणे चुकीचे आहे, हे निंदनीय आहे. कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोक आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत.
महिला द्वारा ड्राइवर से मार-पीट करना बिलकुल गलत है, निंदनीय है. किसी को कानून हाथ में लेने का हक नहीं.@VjaCityPolice ने केस दर्ज कर सही किया.
साथ ही मामले यदि ड्राइवर की भी गलती हो, तो उसकी जांच कर उचित कार्यवाही होनी चाहिए. https://t.co/4IxuA0xuB2
— Dipanshu Kabra (@ipskabra) February 10, 2022
‘कडक कारवाई झाली पाहिजे’
व्हिडिओवर कमेंट करताना एका यूझरने लिहिले, की आजकाल महिला या महिला आणि मुलगी असल्याचा गैरफायदा घेत आहेत, जसे लखनऊची मुलगी, बेंगळुरूची मुलगी आणि आता ही…! पुरुष सर्वत्र चुकीचे नसतात. त्याचवेळी आणखी एका यूझरने लिहिले, की या महिलेवर कडक कारवाई झाली पाहिजे. याशिवाय इतर अनेक यूझर्सनी यावर आपली प्रतिक्रिया दिली.
आज कल महिलाएं महिला और लड़की होने का फायदा खूब उठा रही हैं।
जैसे
लखनऊ वाली लड़की
बैंगलोर वाली लड़की
अब ये बस वाली भी
हर जगह पुरुष गलत नहीं होता है।— maniram yadav NRJ(मनीराम यादव) (@Maniramnrj) February 10, 2022
हर समय एक जैसा नहीं होता ठीक उसी प्रकार हर समय पुरूष ही गलत नहीं होता हैं कहीं कहीं महिला भी गलत करतीं हैं।
आज-कल महिलाओं की मानसिकता यह है कि हम कुछ भी करें पर थाने व अन्य किसी भी स्थान पर सुनवाई तो हमारी ही होंगी।कार्यवाही सच्चाई और इंसाफ की होनी चाहिए न कि किसी भी पक्ष की।
— Aftab Aalam (@AftabAa49977055) February 10, 2022
महिला है इसका मतलब ये नहीं कि खुलेआम मार पीट करे बात करके भी मामला शांत किया जा सकता था महिला के ऊपर भी ऐसे ही कार्यवाही होनी चाहिए।
— SURAJ KUMAR (@SurajK2011) February 11, 2022
आणखी वाचा :