भयानक ! झोपेत बिछाना ओला केला म्हणून पोटच्या पोरीच्या प्रायव्हेट पार्टवर चटके

लहान मुलांना चांगल्या सवयी लागाव्यात, यासाठी पालक त्यांना शिस्त लावतात. पण काही वेळेला शिस्तीचा एवढा अतिरेक होतो की त्यामध्ये मुलांचं बालपण होरपळतं. अशीच एक घटना मुंबईच्या गोवंडीमध्ये घडली आहे. तेथे एके महिलेने तिच्या पोटच्या पोरीला अंगावर चटके देले, ज्यामध्ये ती गंभीररित्या जखमी झाली आहे.

भयानक ! झोपेत बिछाना ओला केला म्हणून पोटच्या पोरीच्या प्रायव्हेट पार्टवर चटके
Follow us
| Updated on: Jul 16, 2024 | 11:18 AM

लहान मुलांना चांगल्या सवयी लागाव्यात, यासाठी पालक त्यांना शिस्त लावतात. पण काही वेळेला शिस्तीचा एवढा अतिरेक होतो की त्यामध्ये मुलांचं बालपण होरपळतं. अशीच एक घटना मुंबईच्या गोवंडीमध्ये घडली आहे. तेथे एके महिलेने तिच्या पोटच्या पोरीला अंगावर चटके देले, ज्यामध्ये ती गंभीररित्या जखमी झाली आहे. आणि या शिक्षेचं कारण काय, तर त्या निरागस मुलीने झोपेत बिछाना ओला केला म्हणून… त्या महिलेने तिच्या पोटच्या लेकीला मारलं आणि एक भांड गॅसवर तापवून त्याच्या सहाय्याने त्या मुलीच्या पाठीवर, मांड्यावर आणि प्रायव्हेट पार्टवरही चटके दिले. गोवंडीतील महिलच्या या निर्दयी कृत्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. शिवाजी नगर पोलिसांनी त्या महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या क्रूर हल्ल्याच्या वेळी आरोपी महिलेचा पती, त्या मुलीचे सावत्र वडील कामावर गेले होते. चटके बसल्यावर मुलगी वेदनेने व्हिवळू लागली, ओरडू लागली. तिचा आरडाओरडा ऐकून शेजारी जमा झाले पण आरोपी महिलेने शेजाऱ्यांनाही शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. हे आमचं कौटुंबिक प्रकरण आहे, तुम्ही यात ढवळाढवळ करू नका, असा इशाराही तिने दिला. अखेर शेजाऱ्यांनी आपत्कालीन 100 क्रमांकावर कॉल करून ही बाब पोलिस नियंत्रण कक्षाला कळवली आणि आईविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांच्या सांगण्यांनुसार, ज्या व्यक्तीने तक्रार दाखल केली ती पीडित मुलीची शेजारी आहे. ही मुलगी गोवंडीतील बैंगनवाडी परिसरात तिची आई आणि सावत्र वडिलांसोबत राहते. आरोपी महिलेला आधीच्या पतीपासून दोन मुली असून दुसऱ्या पतीपासून देखील दोन मुलं आहेत.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठलं आणि त्यांनी पीडित मुलीला लगेच रुग्णालयात नेऊन तिच्यावर उपचार केले. त्यानंतर तिला घरी पाठवण्यात आले. याप्रकरणी त्या आरोपी महिलेला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. मात्र शिवाजी नगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५२, ११८(१), ११५(२) तसेच अल्पवयीन न्याय(मुलांची काळजी व संरक्षण) कलम ७५ अंतर्गत तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

Non Stop LIVE Update
भाजपकडून 110 जणांची नाव निश्चित, या आमदारांचा पत्ता कट तर कोणाला संधी?
भाजपकडून 110 जणांची नाव निश्चित, या आमदारांचा पत्ता कट तर कोणाला संधी?.
जरांगे पाटील कोणाचा खेळ बिघडवणार? राजकीय एन्काऊंटर करण्याचा थेट इशारा
जरांगे पाटील कोणाचा खेळ बिघडवणार? राजकीय एन्काऊंटर करण्याचा थेट इशारा.
लाडकी बहीण योजनेचे नियम मोडले? डिसेंबरनंतर अर्ज तपासणी, होणार वसुली?
लाडकी बहीण योजनेचे नियम मोडले? डिसेंबरनंतर अर्ज तपासणी, होणार वसुली?.
बिश्नोईकडून सलमानला पुन्हा धमकी, '...अन्यथा सिद्दीकींपेक्षा वाईट होईल'
बिश्नोईकडून सलमानला पुन्हा धमकी, '...अन्यथा सिद्दीकींपेक्षा वाईट होईल'.
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील.
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक.
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप.
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?.
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?.
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?.