बायकोला जिवंत गाडायचं होतं.. ती सहन करत गेली, कबर खोदली, तिला फेकलं, मातीही टाकली, अन्…
वाद विकोपाला गेल्यानं दोघांनी घटस्फोटासाठी अर्ज केला होता. दोघेही वेगळे राहत होते. पण त्या दिवशी तो घरी आला अन् या थरारक घटनाक्रमाला सुरुवात झाली...
पती-पत्नीतले (Husband wife) वाद किती विकोपाला जावेत. भांडणं झाली. पोलिसात गेले. कोर्टात (Court) गेले. घटस्फोटाचा (Divorce) अर्ज टाकला. पण तो तिच्या जीवावरच उठला. इतकी डोक्यात तिडीक गेली की तिला जिवंत गाडायचं असं ठरवलं. तिचे हात पाय बांधले. गाडीच्या डिक्कीत कोंबलं. जंगलात कबर खोदली, त्यात तिला फेकलं. पण बायकोही हुशार होती. अत्यंत शिताफीनं तिनं अंगावर माती पडताना आपलं नाक थोडसं वर ठेवलं…
मातीच्या वर नाक राहिल्याने या महिलेला श्वास घेता येऊ लागला. हळू हळू तिने आपल्यावरची माती बाजूला सारायला सुरुवात केली. थोडी मोकळी झाली की हातातील अॅपल वॉचने नातेवाईकांना मेसेजसुद्धा केला. त्यामुळे पोलिसांनाही मदत करायला सोपं झालं. सध्या तिच्या पतीला पोलिसांनी अटक केली आहे.
डेली मेलच्या वृत्तानुसार, ही घटना आहे, अमेरिकेतील वॉशिंग्टनची. 42वर्षांची यांग सूक एन ही घरी एकटीच होती. 53 वर्षांचा तिचा पती चाय क्योंग एन घरी आला. संपत्तीवरून दोघांमध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरु होता.
वाद विकोपाला गेल्यानं दोघांनी घटस्फोटासाठी अर्ज केला होता. दोघेही वेगळे राहत होते. पण त्या दिवशी तो घरी आला अन् या थरारक घटनाक्रमाला सुरुवात झाली…
पत्नी यांगच्या आरोपांनुसार, 16 ऑक्टोबर रोजी क्योंगने तिचं अपहरण केलं. आधी चाकूने हल्ला केला. नंतर हात-पाय बांधले. कारच्या डिक्कीत टाकलं. त्यानंतर एका दूर जंगलात नेलं.
एक मोठा खड्डा खोदला. त्यात तिला टाकलं… पण हे घडत असतानाच यांगने अॅपल वॉचच्या मदतीने मित्र आणि नातेवाईकांना एक अलर्ट मेसेज पाठवला होता.
इकडे यांग कबरीखाली दबलेली आणि पोलिसांचा शोध सुरु झाला. कबरीवर माती टाकत असतानाच यांगने आपलं नाक थोडं बाहेर ठेवलं होतं. कसा-बसा तिनं श्वास सुरु ठेवला.
3 ते4 तास ती दबलेल्या अवस्थेत होती. त्यानंतर सगळं बळ एकवटून तिनं शरीरावरची माती बाजूला सारण्यास सुरुवात केली. स्वतःला बाहेर काढलं. त्यानंतर जंगलात आसरा शोधू लागली.
काही तास फिरल्यानंतर तिला एक सुरक्षित घर सापडलं. तेथून तिने पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी तत्काळ तिला मदत केली.
या घटनेनंतर 17 ऑक्टोबर रोजी यांगच्या तक्रारीनंतर पतीला अटक करण्यात आली. हत्येचा प्रयत्न, घरगुती हिंसेचा गुन्हा त्याच्यावर दाखल करण्यात आलाय.