दीड वर्षाच्या चिमुकलीला कवेत घेऊन महिलेची विहिरीत उडी, चप्पल तरंगताना दिसल्याने थरारक घटना समोर

विवाहित महिलेने आपल्या दीड वर्षाच्या मुलीला घेऊन आत्महत्या केली. विहिरीत उडी घेऊन मायलेकीने (Woman Suicide with Girl) आयुष्य संपवलं.

दीड वर्षाच्या चिमुकलीला कवेत घेऊन महिलेची विहिरीत उडी, चप्पल तरंगताना दिसल्याने थरारक घटना समोर
woman commits suicide at Yavatmal
Follow us
| Updated on: Mar 20, 2021 | 12:38 PM

यवतमाळ :  विवाहित महिलेने आपल्या दीड वर्षाच्या मुलीला घेऊन आत्महत्या केली. विहिरीत उडी घेऊन मायलेकीने (Woman Suicide with Girl) आयुष्य संपवलं. यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव इथे ही धक्कादायक घटना घडली. विहिरीत दोन्ही मृतदेह तरंगताना दिसल्यानंतर, आज सकाळी ही घटना उघडकीस आली. कोमल उमेश उलमाले (30) यांनी दीड वर्षाची चिमुकली श्रुती उमेश उलमाले रा.मारेगाव असं या दुर्दैवी मायलेकीचं नाव आहे. (Woman commits suicide with little girl at Yavatmal Maharashtra crime news)

कोमल उलेमाले या आपल्या लेकीला घेऊन रात्रीच घराबाहेर पडल्या. घरातील सर्वजण झोपेत असल्याचं पाहून 9 ते 11 च्या दरम्यान त्या घरातून निघून गेल्या. घरच्यांनी शोधाशोध केल्यानंतर पोलिसात तक्रार दाखल केली. मारेगाव पोलिसांनी मग शोधाशोध सुरु केली.

विहिरीत चपला तरंगताना दिसला

त्यादरम्यान, उलेमाले कुटुंबाच्या घराजवळच्या पुरके आश्रमशाळेजवळ, थेरे यांच्या शेतातील विहिरीत चपला तरंगताना दिसल्या. त्या चपला कोमल यांच्याच असल्याचं लक्षात आल्यानंतर कुटुंबाची धाकधूक वाढली. आत्महत्येच्या संशयाने विहिरीत गळ टाकून शोध घेतला, त्यावेळी मायलेकीचा मृतदेह आढळला.

दरम्यान या आत्महत्येची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.  मायलेकीच्या आत्महत्येचं वृत्त परिसरात वाऱ्यासारखं पसरलं. गावातील अनेक नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती.

या आत्महत्यने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कोमल यांनी आपल्या दीड वर्षाच्या लेकीसह आत्महत्या का केली, हे अद्याफ कळू शकलेलं नाही. याचा तपास पोलीस घेत आहे.

संबंधित बातम्या 

मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला, त्या मुंब्रा रेतीबंदर परिसरात आणखी एक डेड बॉडी!

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.