डोक्याचा भुगा केला मांत्रिकानं, नवऱ्याला पोराचा नाद, बाई मांत्रिकाकडून बाद, कसं झालं डोकच बाद?

एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका भोंदू मांत्रिकाने गर्भवती महिलेच्या (Pregnant woman) डोक्यामध्ये चक्क खिळा ठोकला आहे. डोक्यात खिळा ठोकल्याने तुला मुलगा होईल असा दावा या मांत्रिकाने केला होता.

डोक्याचा भुगा केला मांत्रिकानं, नवऱ्याला पोराचा नाद, बाई मांत्रिकाकडून बाद, कसं झालं डोकच बाद?
संग्रहित फोटो
Follow us
| Updated on: Feb 10, 2022 | 8:50 PM

पाकिस्तानच्या (Pakistan)पेशावरमधून (Peshawar) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका भोंदू मांत्रिकाने गर्भवती महिलेच्या (Pregnant woman) डोक्यामध्ये चक्क खिळा ठोकला आहे. डोक्यात खिळा ठोकल्याने तुला मुलगा होईल असा दावा या मांत्रिकाने केला होता. त्यानंतर संबंधित महिलेच्या डोक्यात या मांत्रिकाने खिळा ठोकला. खिळा ठोकल्यानंतर या महिलेला प्रचंड वेदना झाल्या. महिलेने आपल्या हाताने डोक्यात ठोकलेला खिळा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तिला तो काढता आला नाही. अशा अवघडलेल्या अवस्थेमध्ये या महिलेने रुग्णालयता धाव घेतली. या महिलेवर उपचार करणाऱ्या डॉक्टर हैदर यांनी सांगितले की या महिलेच्या डोक्यात खिळ्यामुळे गंभीर इजा झाली असून, तिच्यावर उपचार सूरू आहेत. सुरुवातील या महिलेने सांगितले की, आपनच हे कृत्य मांत्रिकाच्या सांगण्यावरून केले. मात्र त्यानंतर या महिलेने आपला जबाब बदलला असून, मांत्रिकानेच आपल्या डोक्यात खिळा ठेकल्याचे या महिलेने सांगितले आहे.

महिलेला पहिल्या तीनही मुलीच

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, पीडित महिलेला पहिल्या तीनही मुलीच आहेत. ही महिला जेव्हा चौथ्यावेळी गर्भवती राहिली तेव्हा आपल्याला मुलगाच व्हावा यासाठी ती एका मांत्रिकाला भेटायला गेली होती. तीला मात्रिकाने सांगितले की तुला जर मुलगा हवा असेल तर तुझ्या डोक्यात खिळा ठोकावा लागेल. त्यानंतर या महिलेच्या डोक्यात मांत्रिकाने खिळा ठोकला. खिळा ठोकल्यानंतर महिलेला प्रचंड वेदना झाल्या. या महिलेने खिळा काढण्याचा प्रयत्न केला मात्र हा खिळा काही निघाला नाही. त्यानंतर त्या महिलेने डॉक्टरांकडे धाव घेतली. डॉक्टरांनी या महिलेवर उपचार सुरू केले असून, या खिळ्यामुळे महिलेच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. पाकिस्तानी मीडियाकडून मिळालेल्या माहितीनुसार ही महिला अशिक्षित आहे.

पतीने दिली होती तलाकची धमकी

या महिलेला पहिल्या तीनही मुली आहेत. दरम्यान चौथी मुलगी झाली तर मी तुला तलाक देईल अशी धमकी या महिलेच्या पतीने तिला दिली होती. तसेच तो पत्नीला सतत टोमने मारत होता. तलाकच्या भीतीने महिलेने अल्‍ट्रासाउंड टेस्ट देखील केली. या टेस्टमध्ये तीच्या पोटात स्त्री भ्रूण असल्याचे आढळून आले. त्यामुळे घाबरलेल्या या महिलेने एका मांत्रीकाची भेट घेतली. मात्रिकाने या महिलेला तुला मुलगा हवा असेल तर डोक्यात खिळा ठोकावा लागेल असे सांगितले. त्यानेच या महिलेच्या डोक्यात खिळा देखील ठोकला. खिळ्यामुळे डोक्याला गंभीर इजा झाली असून, मोठ्याप्रमाणात रक्तस्त्राव झाला आहे. या महिलेवर पेशावरमधील एका रुग्णालयात उपचार सूरू आहेत.

संबंधित बातम्या

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून तीन ठिकाणी छापेमारी; बनावट विदेशी मद्याचा मोठा साठा जप्त, तीन जणांना अटक

Video| बोलता, बोलता महिलांनी लांबवले लाखो रुपयांचे दागिने; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, नाशिकमधील धक्कादायक प्रकार

राम तेरी गंगा मैली, आधी प्रेम नंतर लोच्या- मग एकाच कुटुंबातल्या 5 जणांचा का काढला काटा?

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.