पती बघत होता पहिल्या पत्नीचे reel, दुसरी पत्नी संतापली अन् तिने थेट प्रायव्हेट पार्टवरच..

इन्स्टाग्रामवर लपूछपून पहिल्या पत्नीचे रील पाहणे एका इसमाला फारच महागात पडले. त्याच्या दुसऱ्या पत्नीला हे कळल्यावर तिने रागाच्या भरात जे केलं...

पती बघत होता पहिल्या पत्नीचे reel, दुसरी पत्नी संतापली अन् तिने थेट प्रायव्हेट पार्टवरच..
Follow us
| Updated on: Jul 24, 2023 | 11:33 AM

Wife cut husband private part : पती लपून-छपून पहिल्या बायकोचे व्हिडीओ (husband was watching first wifes video) बघत होता हे समजल्यानंतर त्याची दुसरी बायको भडकली आणि तिने त्याच्यावर हल्ला केला. तिने थेट त्याच्या प्रायव्हेट पार्टवर ब्लेडनेच वार करून त्याला (woman cut husbands private part) जखमी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आंध्र प्रदेशात हा खळबळजनक प्रकार घडला असून जखमी इसमाला उपचारांसाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, आनंद (वय 26 ) असे पीडित इसमाचे नाव असून सुमारे सहा वर्षांपूर्वी त्याचे पहिले लग्न झाले होते. मात्र त्याची पहिली पत्नी व त्याच्यादरम्यान बरेच वाद व्हायचे, अखेर ते दोघे वेगळे झाले. त्यानंतर आनंद याने चार वर्षांपूर्वी 25 वरम्मा हिच्याशी लग्न केले. दोघेही मुप्पला गावात राहून मोल-मजदुरी करत उदरनिर्वाह करतात. शनिवारी वरम्मा हिने आनंदला त्याच्या मोबाईलमध्ये इन्स्टाग्रामवर पहिल्या पत्नीचे व्हिडीओ बघताना पाहिले आणि ती भडकली. त्यावरूनच दोघांदरम्यान वादही सुरू झाला. संतापलेल्या वरम्माचा तोल ढासळला आणि तिने रागाच्या भरात पुढचा मागचा काहीच विचार न करता पतीच्या प्रायव्हेट पार्टवर ब्लेडने वार केला,

उपचारांनंतर सुधारली प्रकृती

या हल्ल्यामुळे तिचा पती, आनंद हा जमिनीवर कोसळला आणि वेदनेने ओरडू लागला. त्याचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी घरी धाव घेतली आणि आनंदला रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहून धक्काच बसला. त्यांनी त्याला तातडीने स्थानिक रुग्णालयात नेले. विजयवाडा हॉस्पिटलमध्ये आनंदची तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की, त्याच्या प्रायव्हेट पार्टवर खोल कट झाला आहे. टाके घालून त्याच्यावर उपचार करण्यात आले व थोड्या वेळाने त्याला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.

कानपूरमध्येही घडला होता असाच प्रकार

जून महिन्यात उत्तर प्रदेशातील कानपूरमध्येही असाच प्रकार घडला होता. एका महिलेने पती झोपेत असताना त्याचा प्रायव्हेट पार्ट कापण्याचा प्रयत्न केला होता. मिळालेल्या माहितीनुसार, पती-पत्नीमध्ये जोरदार वाद झाल्यानंतर पत्नीने हे खळबळजनक कृत्य केले. त्यानंतर मीडित पतीने पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर त्याच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दोघांमध्येही वाद झाला होता, त्यानंतर रात्री पत्नीने ब्लेड घेऊन प्रायव्हेट पार्ट कापण्याचा प्रयत्न केला, असे पीडित इसमाने नमूद केले. सुरूवातील या घटनेची लाज वाटल्याने कोणालाही हा प्रकार सांगितला नाही. मात्र काही दिवसांनी त्या इसमाने पोलिसांत तक्राक दाखल करण्याचा निर्णय घेतला.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.