घरी लग्नसमारंभ सुरु होता, गावातील महिला एकत्र येऊन लग्नाची गाणी म्हणत होत्या, इतक्यात…

गावात लग्न असल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. लग्नाची धावपळ सुरु होती. पुरुष मंडळी तयारी पाहत होते, तर महिला वर्ग गाणी गात होते. इतक्यात जे घडलं ते पाहून सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली.

घरी लग्नसमारंभ सुरु होता, गावातील महिला एकत्र येऊन लग्नाची गाणी म्हणत होत्या, इतक्यात...
लग्नमंडपात वीजेचा शॉक लागून महिलेचा मृत्यू
Follow us
| Updated on: Jun 28, 2023 | 3:45 PM

समस्तीपूर : बिहारमध्ये एका लग्नसमारंभात भयंकर घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे लग्नमंडपात शोककळा पसरली. समस्तीपूर जिल्ह्यातील रोसडा पोलीस ठाण्याअंतर्गत मब्बी गावात लग्न समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. घरामध्ये लग्नाचे विधी सुरु होते. तर दुसरीकडे लग्नमंडपात गावातील सर्व महिला एकत्र बसून लग्नाची गाणी गात होत्या. इतक्यात माईकमध्ये अचानक करंट आला आणि महिलेचा शॉक लागून मृत्यू झाला. घटनेची महिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. मीना देवी असे मयत महिलेचे नाव आहे.

काय घडलं नेमकं?

मब्बी गावात लग्न समारंभ होता. यामुळे गावात लग्नघरासह गावात आनंदाचे वातावरण होते. लग्नघरात प्रत्येक जण तयारीत गुंतला होता. एकीकडे लग्नाच्या विधी सुरु होत्या, पुरुष मंडळी लग्नाची इतर तयारी पाहत होते. तर गावातील सर्व महिलावर्ग लग्नमंडपात बसून लग्नाची गाणी म्हणत होत्या. मंडपात अगदी उत्साहाचे वातावरण होते. पण हा आनंद फार काळ टिकू शकला नाही.

माईकमधून वीजेचा शॉक

एक महिला माईक हातात घेऊन गाणं गात होती, तर अन्य महिला तिला साथ देत होत्या. इतक्यात माईकमध्ये करंट आला आणि महिलेला वीजेचा शॉक लागला. शॉकमुळे महिला तडफडू लागली. महिलेला असं पाहून अन्य महिलांमध्ये एकच खळबळ उडाली. काय झालं हे कळण्याच्या आतच महिलेचा मृत्यू झाला. यामुळे गावात शोककळा पसरली आहे.

हे सुद्धा वाचा

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.