Pune Crime : पतीच्या ऑफीसमध्ये सॅलरी घेण्यासाठी गेली पण तेवढ्यात बॉसने…
ही दुर्दैवी घटना फ्युचर टेक कंपनीच्या आवारात सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास घडल्याची माहिती समोर आली आहे. पीडित महिला तिच्या पतीसह कंपनीत कामासाठी गेली होती.
पुणे | 1 सप्टेंबर 2023 : पतीच्या कामाचे पेमेंट घेण्यासाठी कंपनीत गेलेल्या महिलेचा, तेथील बॉसने विनयभंग (molestation) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एवढेच नव्हे तर त्याने तिला शिवीगाळही केल्याची माहिती समोर आली आहे. अमेय गुर्जर असे आरोपीचे नाव असून तो फ्युचर टेक कंपनीचा संचालक आहे. त्याने पीडित महिलेशी बोलताना गैर शब्दही (crime) वापरले. त्यानंतर ३१ वर्षीय पीडित महिलेने कोथरूड पोलिस स्टेशनला जाऊन तक्रार नोंदवली.
तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी अमेय गुर्जरविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याला आता कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागत आहे. ही धक्कादायक घटना कोथरूडच्या मयूर कॉलनीतील फ्युचर टेक कंपनीच्या आवारात सोमवारी दुपारी दोन वाजता घडली.
नेमकं काय घडलं ?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचा पती हा फ्युचर टेक कंपनीमध्ये काम करत होता. पीडत महिला व तिचा पती हे दोघेही त्याचा पगार घेण्यासाठी सोमवारी कंपनीत गेले होते. त्यावेळी कंपनीचे संचालक अमेय गुर्जर यांनी महिलेला उद्देशून अत्यंत आक्षेपार्ह शब्दांत टिपण्णी केली. त्याने फक्त तिला पैशांबद्दलच विचारले नाही तर तिच्या पतीने तिला पेमेंट घेण्यासाठी पाठवायला हवे होते, अशी हीन कमेंटही केली. त्याच्या आक्षेपार्ह शब्दांमुळे त्याचे चुकीचे हेतूही उघड झाले
धक्कादायक बाब म्हणजे, आरोपीने महिलेचा हात बळजबरीने पकडून तिला कार्यालयातून हाकलून दिले. त्यामध्ये तिची बांगडी तुटली व हातालाही दुखापत झाली. यानंतर संतप्त महिलेने पोलिस स्टेशनमध्ये जाऊन आरोपीविरोधात तक्रार नोंदवली. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.