मस्करीची झाली कुस्करी ! तिसऱ्या मजल्यावरून पडून महिलेचा मृत्यू, डोंबिवलीतील घटनेने खळबळ
जास्त मस्ती करू नका नाहीतर मस्करीची कुस्करी होईल असं आपण बऱ्याचदा म्हणतो. मात्र हीच मस्करी एका महिलेला महागात पडली आणि ती जीव गमावून बसली. मित्रांसोबत मस्करी करताना एका महिला तिसऱ्या मजल्यावरून खाली पडली अन् तिचा मृत्यू झाला. डोंबिवलीमध्ये मंगळवारी दुपारी हा धक्कादायक प्रकार घडला
जास्त मस्ती करू नका नाहीतर मस्करीची कुस्करी होईल असं आपण बऱ्याचदा म्हणतो. मात्र हीच मस्करी एका महिलेला महागात पडली आणि ती जीव गमावून बसली. मित्रांसोबत मस्करी करताना एका महिला तिसऱ्या मजल्यावरून खाली पडली अन् तिचा मृत्यू झाला. डोंबिवलीमध्ये मंगळवारी दुपारी हा धक्कादायक प्रकार घडला असून एकच खळबळ माजली आहे. नगीनादेवी मंजिराम असे मृत महिलेचे नाव असून ती या इमारतीमध्ये सफाईचे काम करायची अशी माहिती समोर आली आहे. ती पिसवली टाटा नाका परिसरात आपल्या कुटुंबासह राहत होती. तिच्या अशा अकस्मात मृत्यूमुळे खळबळ माजली असून नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत. . मानपाडा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.
नेमकं काय झालं ?
डोंबिवली पूर्वेकडील कल्याण शीळ रोडवर विकास नाका परिसरात ग्लोब स्टेट नावाची इमारत आहे. मृत महिला नगीनादेवी मंजिराम ही या इमारतीमधील एका कार्यालयात साफसफाईचे काम करायची. ती पिसवली परिसरात कुटुंबियांसोबत रहायची. तिच्या पश्चात एक मुलगा आणि मुलगी आहे.
मस्ती करत असताना तोल गेला अन्
मंगळारी दुपारी सुमारास नगीनादेवी हे तिचं काम झाल्यावर तिच्या इतर सहकाऱ्यांसोबत ग्लोब स्टेट इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर जिन्याजवळ बसली होती. ते एकमेकांशी बोलत होते, गप्पा मारत होते. नगीनादेवी जिन्याच्या जवळच बसली होती. बोलता बोलता तिच्या एका सहकाऱ्याचा हात तिला लागला आणि त्या दोघांचाही तोल जाऊन ते खाली कोसळले. ती क्षणात खाली कोसळली. त्यावेळी बंटी हा तिचा सहकारी देखील खाली पडला, मात्र इतरांनी त्याला कसेबसे वाचवले. पण नगीनादेवी धाडकन खाली पडली. बराच रक्तस्त्राव झाल्याने तिचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी या घटनेसंदर्भात नोंद केली असून पुढील तपास सुरू केला आहे.