चारचाकी गाडी न मिळाल्याने जावयाने बनवला घाणेरडा व्हिडीओ, पत्नीच्या घरच्यांना व्हिडीओ पाठवून दिली धमकी, म्हणाला…
सासरच्या लोकांनी बोलेरो गाडी न दिल्यास पत्नीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी, हा धक्कादायक प्रकार पोलिसांचया कानावर गेल्यावर त्यांना सुध्दा धक्का बसला आहे.
उत्तर प्रदेश : सध्या सोशल मीडियावर (social media) एक धक्कादायक घटना व्हायरल झाली आहे. ही घटना ऐकल्यानंतर नागरिकांनी त्या जावायाला चोप देण्याची भाषा केली आहे. जावायाने सासरच्या लोकांकडे बोलेरो (bolero car) गाडी मागितली होती. त्यावेळी सासरच्या लोकांनी गाडी देण्यास नकार दिला, त्यावेळी जावयाने पत्नीला जोराची मारहाण केली, त्याचबरोबर पत्नीचा नको त्या अवस्थेतील व्हिडीओ माहेरच्या लोकांना पाठवून दिला आहे. काही व्हिडीओ सोशल मीडियावर टाकले असल्याचे सु्ध्दा त्यांनी सांगितले आहेत. त्या महिलेवरती रेप (up crime news in marathi) करण्यासाठी पुतण्या आणि इतर घरच्यांना सुध्दा पाठवलं होतं असा आरोप त्यांच्यावरती करण्यात आला आहे. दहा लोकांच्या विरोधात पत्नीने तक्रार दाखल केली आहे.,
हा प्रकार उत्तर प्रदेश राज्यातील आहे. त्याचबरोबर हा प्रकार बरेलीच्या इज्जतनगर थाना क्षेत्रात येत आहे. पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे, सध्या सगळे आरोपी फरार आहेत. पोलिस त्यांना शोधण्यात व्यस्त आहेत. ज्या महिलेने त्यांच्या विरोधात तक्रार दिली आहे, तिचं लग्न फेब्रुवारी महिन्यात झालं होतं. त्यानंतर ती तिच्या सासरी गेली होती. तेव्हापासून पती सासरच्या लोकांकडे बोलेरो गाडी मागत होता.
ज्यावेळी महिलेच्या घरच्यांनी गाडी देण्यास नकार दिला, त्यावेळी सासरच्या लोकांनी तिच्याकडे असलेले सगळे सोने काढून घेतले होते. ज्यावेळी त्या महिलेने हे सगळं देण्यास नकार दिला, त्यावेळी सासरच्या लोकांनी तिला जब्बर मारहाण केली होती. महिलेने दिलेल्या माहितीनुसार दोन लोकांनी तिच्यावर बलात्कार करण्याचा अनेकदा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर पतीने आपल्या पत्नीचा अश्लील व्हिडीओ तयार करुन माहेरच्या लोकांना पाठवला आहे.
त्याचबरोबर अशी धमकी दिली आहे की, माझी मागणी पूर्ण झाली नाही तर हा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकण्यात येणार आहे. त्यानंतर आरोपीने या गोष्टी सुध्दा केल्या आहेत. एक दिवस महिलेच्या जेवणात त्यांनी विष सुध्दा टाकलं होतं. ज्यावेळी त्या महिलेला जेवणात विष असल्याची माहिती झाली, त्यावेळी त्या महिलेने जेवण फेकून दिलं होतं, ज्या मांजरीने ते जेवणं खाल्लं तिचा मृत्यू झाला होता. परेशान असलेल्या महिलेने पोलिस स्टेशन गाठलं आणि झालेला सगळा प्रकार सांगितला आहे. पोलिस आरोपींच्या शोधात आहे.