दाताने तोडला कानाचा लचका आणि थेट गिळलाच… पोलिसही झाले हैराण ! तिने असं का केलं ?
प्रेमाचं प्रतीक असलेल्या, जगप्रसिद्ध 'ताजमहाल'साठी आग्रा शहर प्रसिद्ध... मात्र गेल्या काही काळापासून इथून प्रेमाच्या नव्हे तर गुन्ह्यांच्या बातम्या जास्त येत आहेत. त्याही अजीब गु्न्ह्यांच्या. अशीच एक हैराण करणारी घटना समोर आली आहे, जेथे एका महिलेने युवकाच्या कानाचा थेट लचकाच तोडला. धक्कादायक गोष्ट म्हणजे, त्या युवकाच्या तक्रारीनंतर पोलिस तेथे पोहोचले आणि त्यांनी त्या महिलेकडे कानाचा तो भाग परत मागितला, तर...
आग्रा | 11 मार्च 2024 : प्रेमाचं प्रतीक असलेल्या, जगप्रसिद्ध ‘ताजमहाल’साठी आग्रा शहर प्रसिद्ध… मात्र गेल्या काही काळापासून इथून प्रेमाच्या नव्हे तर गुन्ह्यांच्या बातम्या जास्त येत आहेत. त्याही अजीब गु्न्ह्यांच्या. अशीच एक हैराण करणारी घटना समोर आली आहे, जेथे एका महिलेने युवकाच्या कानाचा थेट लचकाच तोडला. धक्कादायक गोष्ट म्हणजे, त्या युवकाच्या तक्रारीनंतर पोलिस तेथे पोहोचले आणि त्यांनी त्या महिलेकडे कानाचा तो भाग परत मागितला, तर महिलेने निर्लज्जपणे, पोलिसांसमोरच तो कानाचा तुकडा चावून, गिळून टाकला. तिचं हे कृत्य पाहून पोलिसही हैराण झाले, हादरले. या घटनेनंतर आरोपी महिलेविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.
काय आहे संपूर्ण प्रकरण ?
खरंतर अतिशय क्षुल्लक मुद्यावरून झालेल्या वादानंतर ही घटना घडली. पीडित युवक आणि आरोपी महिला हे दोघेही शेजारी असून ते भाड्याच्या घरात कुटुंबियांसह रागहतात. मात्र त्यांच्यात कोणत्यातरू मुद्यावरून वाद झाला. भांडण वाढलं आण रागाच्या भरात संतप्त महिलेने पुढचा-काहीच विचार केला नाही, तिचा तोल ढळला आणि तिने दातांनीच त्या युवकाच्या कानाचा लचका तोडला. एवढंच नव्हे तर तिने तो कानाचा भाग चक्क गिळलाही. त्यांच्याशिवाय इतरही अनेक लोक त्याच घरात भाड्याने राहतात.
न्यू आग्रा येथील देवी नगर भागात राहणारा रामवीर बघेल हा तरूण ई-रिक्षा चालवतो. तो कुटुंबियांसह रविंद्र यादव याच्या घरात, भाड्याने राहतो. त्या मोठ्या घरात इतरही लोक भाड्याने राहतात. मात्र त्या घरातील एक महिला, राखी ही स्वत:ला मालक समजते आणि सर्वांवर अरेरावी दाखवते. छोट्या-छोट्या गोष्टींवरून तिचं इतरांशी सतत भांडण व्हायचं
गेट न लावल्यावरून झाला वाद
4 मार्च रोजी त्याच घरातील एका इसमाच्या मुलाची परीक्षा सुरू होती, म्हणून रामवीर हा त्याची रिक्षा घेऊन सकाळी लवकर बाहेर पडला. घाईघाईत जाताना तो मेन गेट नीट लावायला विसरला. झालं…. याच मुद्यावरून आरोपी स्त्री, राखी हिने रामवीर याच्याशी वाद घालायला सुरूवात केली. त्याने तिला बरंच समजवण्याचा प्रयत्न केला.
त्यांचा वाद वाढला. आणि संतापाच्या भरात राखी हिने रामवीर ह्याच्या कानाचा थेटका लचकाच तोडला आणि तो गिळूनही टाकला. याप्रकरणी रामवीरच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई सुरू आहे.