गाझियाबाद | 23 ऑगस्ट 2023 : भावाच्या अवैध संबंधांमुळे व्यथित झालेल्या तरुणीने तिच्याच नणंदेच्या हत्येचा कट (crime) रचल्याचे समोर आले आहे. अगदी फिल्मी स्टाइलने खुनाचा हा प्लान आखण्यात आला. कोणालाही संशय येऊ नये म्हणून तिने खूप हुशारीने हे प्लानिंग करत (murder plan) नणंदेला संपवले. पोलिसांनी आरोपी वहिनीला अटक केली आहे.
तलावाजवळ एक मृतदेह आढळल्याची माहिती 20 ऑगस्ट रोजी गाझियाबाद पोलीसांना मिळाली. त्यांनी तपास केला असता प्रीती असे मृत तरूणीचे नाव असल्याचे समार आले. ती गौतम बुद्ध नगर येथील रहिवासी होती. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवून पोलिसांनी तपास सुरू केला. प्राथमिक तपासात हे प्रकरण आत्महत्या किंवा अपघात असल्याचे दिसत होते, मात्र तरीही पोलिसांनी पुझील तपास सुरू ठेवला.
याप्रकरणी त्यांनी आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता, सुमन या आणखी एका महिलेचे नाव समोर आले. त्यानंतर पोलिसांनी समुन, तसेच राकेश या आणखी एका व्यक्तीलाही अटक केली. आरोपी सुमनचा भाऊ व आणखी एक साथीदार अद्याप फरार आहे.
मृत्यूचे कारण काय ?
खरंतर आरोपी सुमन हिचे, मृत महिला पिंकी हिच्या भावाशी काही वर्षांपूर्वी लग्न झाले होते. तर प्रीतीचा विवाह देखील बुलंदशहरमधील तरूणाशी झाला. मात्र काही काळाने आरोपी सुमन व पतीचे पटत नसल्याने ते वेगळे झाले आणि ती एकटी राहू लागली. तर त्याचवेळी घरगुती वादामुळे प्रीती हिचेही पतीसोबतचे संबंध बिघडले. त्यानंतर तीदेखील सुमनसोबत राहू लागली. मात्र सुमनचा भाऊ आणि प्रीती यांचे अनैतिक संबंध सुरू झाले , त्यामुळे सुमनच्या कुटुंबाची बदनामी होऊ लागली.
बदनामीमुळे उचलले हे पाऊल
या बदनामीमुळेचे सुमनने पिंकीच्या हत्येचा कट रचला. 19 ऑगस्ट रोजी सुमन आणि तिचा भाऊ नन्हे यांच्याशिवाय आणखी दोन जणांनी पिंकीला झोपेच्या गोळ्या खाऊ घातल्या. नंतर तिचा मृतदेह वेव्हसिटी परिसरात आणून पाण्यात बुडवला आणि तिला तसेच सोडून ते फरार झाले, असे पोलिसांनी सांगितले. शवविच्छेदन अहवालानंतर ही आत्महत्या किंवा अपघात नसून हत्या असावी असा संशय पोलिसांना आला होता.